प्रसिद्ध रिलस्टार सनी जाधववर बलात्काराचा आरोप; सोशल मीडियावर खळबळ

On: June 17, 2024 5:09 PM
case has been filed against Sunny Jadhav
---Advertisement---

Sunny Jadhav | अहमदनगर येथील प्रसिद्ध व्यापारी सनी जाधव याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनीचे शहरात मोठे नाव आहे. रुबाब उद्योग समूहाचा संचालक असणाऱ्या सनीच्या महाराष्ट्रात अनेक शाखा आहेत.

सोशल मीडियावर युवकांना आकर्षित करून तो तरुणांना शाखा देत होता. त्याने बऱ्याच जणांची आर्थिक फसवणूक केल्याचे आरोपही आहेत. अशात सनीवर अत्याचाराचे आरोप करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

रुबाब उद्योग समूहाचा संचालक सनी जाधव

सनी जाधवने पुण्यातील एका महिलेशी व्यावहारिक संबंध प्रस्थापित केले होते. तिचा विश्वास संपादन करत त्याने तिच्याशी जवळीक साधली. या महिलेला सनीने कोरेगाव येथील एका हॉटेलवर नेत तिच्यावर अत्याचार केले. असा आरोप या महिलेने केला आहे.

इतकंच नाही तर, सदर महिलेचे अश्लील फोटो व्हायरल (Sunny Jadhav) करण्याची देखील धमकी सनीने दिली असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी सनीवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सनी जाधववर अत्याचाराचे आरोप

या प्रकरणी महिलेने (Sunny Jadhav)तक्रार दाखल केली आहे. मात्र पोलिसांनी अद्यापही आरोपीला अटक केलेली नाही.अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी असा मोकळा आणि बिनधास्त फिरत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

News Title –  case has been filed against Sunny Jadhav

महत्त्वाच्या बातम्या-

“दलित बुद्धांनो आता तरी शहाणे व्हा!”, प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

महिलांच्या ‘या’ सवयींमुळे पतीचं आयुष्य होतं बरबाद!

“तुझ्यात ठाकरेंच रक्त असेल तर…”; आदित्य ठाकरेंना ‘या’ नेत्याचं खुलं आव्हान

आत्महत्या केलेल्या समर्थकाच्या अंत्यविधीवेळी पंकजा मुंडे ढसा ढसा रडल्या!

“..तर उद्धव ठाकरेंना कोकणात पाय ठेऊ देणार नाही”; राणेंचा इशारा

Join WhatsApp Group

Join Now