‘हातात लांब ब्लेड होता, तो जेहबाबाकडे जाऊ लागला’; केअरटेकरने सांगितला हल्ल्याचा थरार

On: January 17, 2025 11:37 AM
Saif Ali Khan Attacker Arrested
---Advertisement---

Saif Ali Khan l “मध्यरात्रीच्या सुमारास अचानक एक जण बाहेर आला. त्याच्या हातात ब्लेडसारखे काहीतरी होते. त्याच्या धाकात त्याने एक कोटी रुपयांची मागणी करत हल्ला चढवला. मदतीसाठी पुढे आलेल्या सैफवर तो सपासप वार करत होता,” असे सांगताना अंगावर शहारे आणणारा तो प्रसंग, सैफच्या घरी काम करणाऱ्या केअरटेकर (Caretaker) एलियामा फिलीप (५६) यांनी सांगितला आहे.

फिलीप यांनी पोलिसांना (Police) दिलेल्या जबाबा (Statement) नुसार, त्या चार वर्षांपासून सैफच्या (Saif Ali Khan) घरी स्टाफ नर्स (Staff Nurse) म्हणून काम करतात. सैफ यांचा धाकटा मुलगा जहांगीर ऊर्फ जेह (Jeh) याचा सांभाळ त्या करतात. खान कुटुंबीय (Khan Family) ११ व १२ व्या मजल्यावर राहतात. ११ व्या मजल्यावर ३ रूम असून त्यातील एका रूममध्ये सैफ, करीना (Kareena) राहतात. दुसऱ्या रूममध्ये तैमूर (Taimur), तर तिसऱ्या रूममध्ये जेहबाबा राहतात. १५ जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता जेहबाबाला जेवण करून झोपवले आणि त्यानंतर ही घटना घडली.

“तो अंगावर धावून आला” :

त्यात्यानंतर पहाटे दोनच्या सुमारास काही तरी आवाज आल्याने जाग आली. त्यावेळी बाथरूमचा (Bathroom) दरवाजा उघडा दिसला. तेव्हा एक जण बाथरूम मधून बाहेर येऊन जेहबाबाकडे जाऊ लागला. ‘कोई आवाज नहीं और कोई बाहर भी नहीं जाएगा’ असे बोलून त्याने आम्हाला धमकावले. जेहबाबाला उठवण्यास जाताच तो अंगावर धावून आला. त्याच्या डाव्या हातात लाकूड, तर उजव्या हातात लांब ब्लेड होते. झालेल्या झटापटीत त्याने माझ्यावर ब्लेडने वार करण्याचा प्रयत्न केला.

Saif Ali Khan l “त्याने सैफवर सपासप वार केले” :

” ‘आपको क्या चाहिए’ विचारताच त्याने एक कोटीची मागणी केली. आरडाओरडा केला. तेव्हा, सैफ आणि करीना धावले. सैफने त्याला हटकले असता त्याने सैफवर सपासप वार केले. त्यावेळी तैमूरची आया गीता मधे आली,” असे फिलीप यांनी सांगितले. फिलीप यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे.

News Title: Caretaker Recounts Horrifying Attack on Saif Ali Khan

महत्वाच्या बातम्या-

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, ‘या’ तारखेपर्यंत मिळणार पैसे

सैफ अली खानच्या आधी ‘या’ अभिनेत्यांच्या घरीही झालीये घुसखोरी, नावं ऐकून धक्का बसेल

सैफ अली खान हल्ला प्रकरणात अत्यंत धक्कादायक खुलासा समोर!

NEET UG ची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी!

एसटीच्या चालक आणि वाहकांसाठी गुडन्यूज, महामंडळानं केली सर्वात मोठी घोषणा

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now