Canara Bank Recruitment | बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कॅनरा बँकेने देशभरात 3500 शिकाऊ उमेदवारांची भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 12 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया बँकेच्या अधिकृत वेबसाइट canarabank.bank.in वर सुरू झाली आहे.
पात्रता आणि वयोमर्यादा :
या भरतीसाठी अर्जदारांकडे भारत सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी पदवी 1 जानेवारी 2022 पूर्वी आणि 1 सप्टेंबर 2025 नंतर पूर्ण केलेली नसावी.
किमान वय: 20 वर्षे
कमाल वय: 28 वर्षे (1 सप्टेंबर 2025 रोजी)
आरक्षणानुसार सवलत:
SC/ST उमेदवारांना 5 वर्षे
OBC उमेदवारांना 3 वर्षे
PwD उमेदवारांना 10 वर्षे
Canara Bank Recruitment | पगार आणि सुविधा :
निवड झालेल्या शिकाऊ उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत दरमहा 15,000 रुपये मानधन (स्टायपेंड) मिळेल. यामध्ये 10,500 रुपये कॅनरा बँकेकडून दिले जातील तर 4,500 रुपये भारत सरकारकडून थेट खात्यात जमा केले जातील.
अर्ज कसा करावा? :
– बँकेच्या अधिकृत वेबसाइट canarabank.bank.in ला भेट द्या.
– “Engagement of Graduate Apprentice in Canara Bank under Apprenticeship” या लिंकवर क्लिक करा.
– आवश्यक माहिती भरून नोंदणी करा.
– अर्ज पूर्ण करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
– अर्ज शुल्क भरावे (SC/ST/PwD उमेदवारांसाठी शुल्क नाही, इतरांसाठी ₹500).
– अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआउट घ्या.
निवड प्रक्रिया :
– उमेदवारांना स्थानिक भाषेच्या ज्ञानाची चाचणी द्यावी लागेल.
– ज्यांनी 10वी किंवा 12वीत स्थानिक भाषा शिकल्याचे प्रमाणपत्र दिले आहे, त्यांना या चाचणीतून सूट दिली जाईल.
– वैद्यकीय तपासणीत पात्र ठरल्यावरच उमेदवारांची निवड निश्चित होईल.






