संभाव्य मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर; कोणाला किती मिळणार मंत्रिपदं

On: November 24, 2024 2:58 PM
Cabinet Ministry Formula
---Advertisement---

Cabinet Ministry Formula l महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीने सर्वाधिक जागा मिळवून पुन्हा एकदा सत्ता हाती घेतली आहे. यावेळी महायुतीने दोनशेहून अधिक जागा मिळविण्याचा प्रकार राज्यात घडला आहे. अशातच उद्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्रि‍पदापासून मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलावर महायुतीमध्ये जोरदार चर्चा देखील सुरु झाली आहे. मात्र यावेळी महायुतीचा नेमका फॉर्मुला कसा असू शकतो याची माहिती समोर आली आहे.

कोणाला किती मंत्रिपदं मिळणार? :

महायुतीच्या मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला आता समोर आला आहे. यावेळी 21-12-10 अशी मंत्रिमंडळाची विभागणी केली जाणायची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच यामध्ये सर्वात जास्त जागा जिंकणाऱ्या भाजप पक्षाला 21 मंत्रिपदे मिळण्याची दाट शक्यता आहे.

तसेच त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 12, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच या सूत्रावर प्राथमिक चर्चा झाली असून तिन्ही पक्षांचे मुख्य नेते दिल्लीतील वरिष्ठ दिग्गज नेत्यांशी चर्चा करणार आहेत. मात्र यामध्ये देखील बदल होऊ शकतो.

Cabinet Ministry Formula l कोणाला किती जागा मिळाल्या? :

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला 288 पैकी तब्ब्ल 226 जागांवर यश मिळालं आहे. यामध्ये भाजप पक्षाला 132, शिवसेनेला 57, तर राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या आहेत. याशिवाय भाजपच्या मित्रपक्षांना पाच, तर शिंदेंच्या मित्रपक्षांना एका जागेवर यश मिळालं आहे.

तसेच यावेळी महाविकास आघाडीच्या वाट्याला देखील 46 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये काँग्रेसला 16, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा, तर शिवसेना ठाकरे गटाला 20 जागा मिळाल्या आहेत.

News Title – Cabinet Ministry Formula 

महत्त्वाच्या बातम्या-

निकालानंतर EVM विरोधात याचिका कोण दाखल करणार?

जरांगे फॅक्टरचा फायदा कुणाला?, सर्वाधिक मराठा आमदार कोणत्या पक्षाचे आले?

“त्या गरजा माझ्या खूपच कमी झाल्या आहेत”, प्राजक्ता माळीचा मोठा खुलासा

बच्चू कडूंना पराभवाचा जोरदार धक्का, म्हणाले मी…

मोठी बातमी! औक्षण करताना उडाला भडका, नवनिर्वाचित आमदार जखमी

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now