Pune Bus Accident | पुण्याजवळच्या ताम्हिणी घाटात बस उलटली, महत्त्वाची अपडेट हाती!

On: December 30, 2023 1:08 PM
Pune Bus Accident
---Advertisement---

Pune Bus Accident | पुण्याजवळच्या ताम्हिणी घाटात अत्यंत भीषण अपघात झाला आहे. ताम्हिणी घाटात बस पलटल्याची माहिती समोर आली आहे. माणगांव पोलीस ठाणे हद्दीत ताह्मिणी घाटात आज सकाळी भीषण अपघात झाला आहे.

ताम्हिणी घाटात बस उलटली

सकाळी 07.30 वाजण्याच्या सुमारास ट्रॅव्हल बस उलटली. ट्रॅव्हल्स क्रमांक MH 04 FK 6299 ही पुण्यावरून माणगावकडे येत होती. इतक्यात रस्त्याखाली उतरली आणि बस पलटी झाली. या बसचा भीषण अपघात झाला आहे.

मदत आणि बचाव कार्य सुरु आहे, अशी माहिती रायगडचे एसपी सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, अपघाताचं कारण अद्याप पुढे आले नाही. अपघाताची माहिती मिळताच गावकरी मदतीला धावून आले. नागरिकांनी बसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढले. ज्यात दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. तर, 55 जखमी आहेत.

Pune Bus Accident

पुण्याहून शाळेची सहल कोकणात जात असताना ताम्हीणी घाटात या बसचा अपघात होऊन बस उलटली. ताम्हिणी घाटात अवघड वळणावर बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस उलटली असल्याचे बोलले जात आहे.

जखमी प्रवाशांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Weather Update | ऐन थर्टी फर्स्टला ‘या’ भागात पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा इशारा

Facebook, Instagram वापरताना काळजी घ्या, नाहीतर होणार अकाऊंट डिलीट; सरकारकडून नवे नियम लागू

Mutual Funds | म्युच्युअल फंडात गंतवणूक करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

क्रिकेट जगतात खळबळ!!! IPL खेळणारा ‘हा’ बडा क्रिकेटपटू बलात्काराच्या आरोपात दोषी, काय होणार शिक्षा?

Malaika Arora नं केली दुसऱ्या लग्नाची घोषणा… कोणासोबत लग्न करणार हे सुद्धा सांगितलं!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now