Bumrah vs Karun Nair l जसप्रीत बुमराह, (Bumrah) भारताचा अनुभवी आणि विश्वसनीय वेगवान गोलंदाज, IPL 2025 मध्ये दुखापतीनंतर पुनरागमन करत आहे. मात्र, दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात त्याला चांगलाच मार सहन करावा लागला. एवढाच नव्हे तर, राग अनावर होऊन करुण नायरसोबत थेट मैदानात वाद घालण्यापर्यंत गोष्ट गेली! सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Jasprit Bumrah vs Karun Nair)
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला 12 धावांनी पराभूत केलं. मात्र या सामन्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे बुमराह विरुद्ध नायर सामना.
बुमराहला मार पडला आणि राग अनावर झाला! :
जसप्रीत बुमराहने या सामन्यात 4 षटकांत 44 धावा दिल्या आणि एकही विकेट मिळवू शकला नाही. करुण नायरने त्याच्या गोलंदाजीवर धडाधड चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. नायरने केवळ 40 चेंडूत 89 धावांची आक्रमक खेळी केली, ज्यात 5 षटकार आणि 12 चौकारांचा समावेश होता.
View this post on Instagram
हा मार बुमराहला सहन झाला नाही. एका षटकानंतर त्याने थेट नायरकडे जाऊन काहीशी तणावपूर्ण चर्चा केली. दोघांमध्ये झालेला वाद इतका वाढला की, मुंबईचा कॅप्टन हार्दिक पांड्याला मध्यस्थी करावी लागली. मैदानावर उभा असलेला रोहित शर्मा मात्र या सगळ्याकडे मंद स्मित करत पाहताना दिसला. (Jasprit Bumrah vs Karun Nair)
Bumrah vs Karun Nair l दुखापतीतून आलेला बुमराह फॉर्मसाठी संघर्ष करताना दिसतोय :
बुमराहने 7 एप्रिल रोजी RCB विरुद्ध पुनरागमन केलं होतं. मात्र त्या सामन्यातही त्याला विकेट मिळाली नाही. दिल्लीविरुद्ध त्याने पुन्हा धावा खर्च केल्या आणि आत्मविश्वास हरवलेला जाणवला. बुमराहसारख्या वर्ल्ड क्लास बॉलरला जेव्हा कामगिरी करता येत नाही, तेव्हा नैसर्गिक रिअॅक्शन राग म्हणून बाहेर पडते, असं अनेकांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे.
करुण नायरसारख्या अनुभवी फलंदाजाकडून मिळालेल्या धक्क्यामुळे बुमराहचं संतुलन थोडकं बिघडलं, हे या घटनेवरून स्पष्ट होतं. मात्र बुमराहची ही अवस्था चाहत्यांसाठी चिंता निर्माण करणारी आहे.






