Bumrah Angry l आयपीएल 2025 च्या 29 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र सामन्यातील सर्वात चर्चेचा क्षण ठरला तो म्हणजे जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि करुण नायर (Karun nair) यांच्यात झालेला वाद. सध्या या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मुंबई इंडियन्सने (MI) प्रथम फलंदाजी करत 205 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात दिल्लीनेही जोरदार सुरुवात केली, ज्यात करुण नायरची अर्धशतकी खेळी ठळक ठरली. मात्र नायर आणि बुमराहमध्ये रंगलेल्या वादाने चाहत्यांनाही आश्चर्यचकित केलं.
नायरनं बुमराहला धुतला, मग मैदानात वाद :
करुण नायरने (Karun Nair) बुमराहच्या गोलंदाजीवर मोठ्या फटकेबाजीसह धावांचा मारा केला. त्याने केवळ 22 चेंडूत अर्धशतक पूर्ण करत 89 धावांची जबरदस्त खेळी केली. त्यानंतर एका षटकाच्या शेवटी ड्रिंक्स ब्रेकच्या वेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
The average Delhi vs Mumbai debate in comments section ????
Don’t miss @ImRo45 ‘s reaction at the end ????
Watch the LIVE action ➡ https://t.co/QAuja88phU#IPLonJioStar ???? #DCvMI | LIVE NOW on Star Sports Network & JioHotstar! pic.twitter.com/FPt0XeYaqS
— Star Sports (@StarSportsIndia) April 13, 2025
बुमराह दुखापतीनंतर पुनरागमन करत आहे, मात्र त्याला अद्याप अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. करुण नायरकडून सतत फटकेबाजी झाल्याने बुमराहचा संयम सुटला आणि तो थेट नायरला भिडला. यावेळी नायरने कर्णधार हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) तक्रार केली, ज्याने लगेच हस्तक्षेप करून वाद शांत केला.
Bumrah Angry l रोहित शर्मा हसला, व्हिडिओ झाला व्हायरल :
या सर्व घडामोडी दरम्यान मैदानावर उपस्थित असलेला रोहित शर्मा (Rohit shamra) हसत राहिल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं. रोहितची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली असून अनेकजण “हिटमॅनचा कूल अंदाज” म्हणून तिचं कौतुक करत आहेत.
सामन्याचा अंतिम निकाल पाहता, बुमराहला विकेट मिळाल्या नसल्या तरी मुंबई इंडियन्सने 12 धावांनी विजय मिळवला. कर्ण शर्मा ‘प्लेयर ऑफ द मॅच’ ठरला, मात्र या सामन्यातील सर्वात चर्चेचा व्हिडिओ ठरला तो बुमराह-नायर वादाचा.






