Buldhana crime | बुलढाणा जिल्ह्यातून शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. मलकापूर (Malkapur) येथील दोन शिक्षकांनी एका विद्यार्थ्याला परीक्षेत उत्तम गुण देण्याचे आमिष दाखवून त्याच्या आईवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपी शिक्षकांना अटक केली आहे.
गुणांच्या बदल्यात आईकडे अश्लील मागणी
बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील मलकापूर (Malkapur) येथील एका शाळेतील इंगळे आणि थाटे नावाच्या दोन सहायक शिक्षकांवर एका ३४ वर्षीय महिलेने गंभीर आरोप केले आहेत. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, या दोन्ही शिक्षकांनी तिच्या मुलाला परीक्षेत चांगले गुण देऊन टॉपर बनवण्याचे आमिष दाखवले. (Buldhana Crime News)
या बदल्यात त्यांनी पीडित महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. ही मागणी पूर्ण न केल्यास मुलासह जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. अनेक दिवसांपासून हे शिक्षक महिलेचे लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप आहे. (Malkapur Crime News)
आरोपी शिक्षक अटकेत, न्यायालयीन कोठडी
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपी शिक्षकांना, इंगळे (Ingale) आणि थाटे (Thatte), अटक केली आहे. त्यांच्याविरोधात संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही शिक्षकांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, समाजात आदराने पाहिल्या जाणाऱ्या शिक्षकांनीच असे कृत्य केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा प्रवृत्तींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.
Title : Buldhana Teachers Arrested for Assaulting Mother






