मुलाचा धक्कादायक कारनामा; गुरू चिचकरांच्या सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा

On: April 25, 2025 5:58 PM
Guru Chichkar
---Advertisement---

Guru Chichkar | नवी मुंबईतील (Navi Mumbai) प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक गुरू चिचकर यांनी शुक्रवारी सकाळी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले. त्यांचा मुलगा नवीन चिचकर हा परदेशातून ड्रग्ज सिंडिकेट चालवत असून, पोलिसांनी वडिलांना चौकशीसाठी बोलावल्यानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. घटनास्थळी सुसाईड नोट आढळली आहे.

चौकशीच्या भीतीने जीवन संपवले?

गुरू चिचकर (Guru Chichkar) यांनी शुक्रवारी पहाटे राहत्या घरी ९ एमएमच्या बंदुकीने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली. एनआरआय पोलिसांनी (NRI Police) त्यांना मुलांशी संबंधित एका मोठ्या ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते. या चौकशीच्या धास्तीने किंवा संभाव्य कारवाईच्या भीतीने त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

त्यांच्याकडे ९ एमएम बंदुकीचा परवाना कसा होता, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे, कारण सामान्यतः अशा बंदुकीचा परवाना दिला जात नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.

फरार मुलगा, सुसाईड नोटमधील आरोप

काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या (Mumbai) अमली पदार्थ विरोधी पथकाने नवी मुंबईत (Navi Mumbai) मोठी कारवाई करत २०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. या प्रकरणात गुरू चिचकर (Guru Chichkar) यांच्या दोन्ही मुलांचा सहभाग उघड झाला होता. एक मुलगा सध्या तुरुंगात आहे, तर दुसरा मुलगा, नवीन चिचकर (Navin Chichkar), जो भारतातील (India) मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज माफिया असल्याचे म्हटले जाते, तो परदेशातून आपले रॅकेट चालवत असून फरार आहे.

गुरू चिचकर (Guru Chichkar) यांना याच प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत, मुलांच्या प्रकरणामुळे पोलीस अधिकाऱ्यांकडून सतत छळ होत असल्याने आपण जीवन संपवत आहोत, असे नमूद केल्याची माहिती आहे. या चिठ्ठीमुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.

Title : Builder Ends Life After Summons in Son’s Drug Case

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now