Mobile Recharge Plan l आजकाल सर्वच खाजगी कंपन्यांनी मोबाईल रिचार्जच्या किंमतीत वाढ केली आहे. मात्र आता सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने एक सर्वात स्वस्त प्लॅन लाँच केला आहे. BSNL कंपनीने 797 रुपयांचा नवीन रिचार्ज प्लॅन आणला आहे. या प्लॅनमुळे जिओ आणि एअरटेल कंपन्यांचं टेन्शन वाढलं आहे.
बीएसएनएलने लाँच केला स्वस्त प्लॅन :
बीएसएनएल कंपनीने 797 रुपयांचा लाँच केलेला प्लॅन हा 300 दिवसांचा आहे, जो 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असणार आहे. तसेच Jio आणि Airtel ने अद्याप 300 दिवसांसाठी 1000 रुपयांच्या खाली कोणताही रिचार्ज प्लॅन सादर केलेला नाही. या रिचार्जनुसार ग्राहकांना दररोज 3 रुपये खर्च करावे लागणार आहेत.
BSNL चा 797 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन 300 दिवसांची वैधता देत आहे. या प्लॅनमध्ये फ्री व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये पहिल्या 60 दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. या कालावधीत तुम्हाला पहिले 60 दिवस अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच दररोज 2 GB डेटा ऑफर केला जाईल. मात्र या कालावधीत वापरकर्त्यांना एसएमएस सुविधा मोफत मिळणार नाही.
तसेच या 60 दिवसांनंतर, वापरकर्ते अमर्यादित इनकमिंग व्हॉइस कॉल प्राप्त करण्यास सक्षम असतील. परंतु या कालावधीत तुम्ही आउटगोइंग कॉल करू शकणार नाही. ही योजना अशा वापरकर्त्यांसाठी आहे ज्यांच्याकडे दोन सिम कार्ड आहेत.
Mobile Recharge Plan l 60 दिवसांनी काय होईल? :
या प्लॅनमध्ये यूजर्स पहिल्या दोन महिन्यांसाठी इनकमिंग आणि आउटगोइंग कॉलिंगचा आनंद घेऊ शकतील. पण यानंतर तुम्हाला 240 दिवस फक्त इनकमिंग कॉल मिळू शकतील. यानंतर डेटा आणि कॉलिंगसाठी वेगळे रिचार्ज करावे लागेल.
BSNL लवकरच संपूर्ण देशात 4G आणि 5G सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. काही राज्यांमध्ये 4G सेवा सुरू झाली आहे. तर येत्या काही महिन्यांत देशातील बहुतांश राज्यांमध्ये 4G सेवा सुरू करण्याची तयारी सुरू आहे.
News Title : BSNL 797 Rs Recharge Plan
महत्वाच्या बातम्या-
वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या सविस्तर
‘या’ दिवशी थिएटरमध्ये 99 रुपयात पाहता येणार सिनेमा; असं बुक करा तिकीट
निधी मिळत नसल्याने शिंदे गटातील नेत्यानी विष घेत उचललं टोकाचं पाऊल, पुढे काय घडलं
रश्मी ठाकरे होणार राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री?, चर्चेला उधाण
लग्न असो किंवा आजारपण PF खात्यातून काढता येणार ‘इतकी’ रक्कम; केंद्राचा मोठा निर्णय






