बाजारात ‘या’ मोबाईल कंपनीने उडवली खळबळ; 5000GB डेटा मिळणार

On: September 24, 2024 2:22 PM
Recharge Plans
---Advertisement---

Mobile Recharge New Plan l बीएसएनएल या सरकारी कंपनीने खासगी टेलिकॉम कंपन्यांच टेन्शनचं वाढवलं आहे. BSNL ने ब्रॉडबँड इंटरनेट वापरकर्त्यांसाठी एक स्वस्तात मस्त योजना आणली आहे, ज्यामध्ये 5000 GB डेटा उपलब्ध असणार आहे. या योजनेत वापरकर्त्यांना 200Mbps ने इंटरनेट सुविधा देखील दिली जाणार आहे.

या OTT ॲप्सचं मोफत सबस्क्रिप्शन मिळणार :

BSNL चा हा प्लॅन 999 रुपये प्रति महिना किमतीत उपलब्ध आहे, ज्यामध्ये यूजरला संपूर्ण महिन्यासाठी 5000 GB इंटरनेट डेटा मिळेल. तसेच या स्कीममध्ये ग्राहकांना 200Mbps च्या वेगाने इंटरनेट सुविधा दिली जाणार आहे. याशिवाय डेटा संपल्यानंतर देखील वापरकर्त्याला 10Mbps च्या वेगाने अमर्यादित इंटरनेट मिळणार आहे.

याशिवाय, BSNL या ब्रॉडबँड प्लॅनसह वापरकर्त्यांना अनेक OTT ॲप्सचे विनामूल्य सबस्क्रिप्शन देखील देत आहे. वापरकर्त्यांना Disney Plus Hotstar, Sony LIV, Zee5, YuppTV आणि हंगामा यासारख्या प्लॅटफॉर्मवर मोफत सबस्क्रिप्शन मिळणार आहे.यासोबतच या स्कीमद्वारे देशभरातील कोणत्याही नंबरवर अमर्यादित कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे.

Mobile Recharge New Plan l कंपनीने माहिती केली शेअर :

BSNL ने आपल्या अधिकृत X हँडलवर या प्लॅनची ​​माहिती शेअर केली आहे. वापरकर्ते त्यांच्या नंबरवरून BSNL 18004444 वर WhatsApp वर “Hi” पाठवून या स्कीमचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय, वापरकर्ते X पोस्टवर दिलेला QR कोड स्कॅन करून देखील या स्कीमचा लाभ घेऊ शकतात. या योजनेसाठी वापरकर्ते कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा जवळच्या टेलिफोन एक्सचेंजशी देखील संपर्क साधू शकतात.

अशातच आता BSNL कंपनीने लाँच केलेल्या या प्लॅनमुळे खाजगी कंपन्यांना मोठा धक्का बसणार आहे. तसेच आता BSNL कंपनी लवकरच 5G सेवा देखील सुरु करणार आहे.

News Title : BSNL 5000GB data plan launched

महत्वाच्या बातम्या –

सिद्धीविनायक मंदिरात घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर सगळीकडे खळबळ!

अक्षय शिंदेचा पोलिसांसोबतचा व्हिडीओ आला समोर!

अक्षयचं एन्काऊंटर कुठे झालं?, फॉरेन्सिक टीमला पोलीस व्हॅनमध्ये सापडला महत्त्वाचा पुरावा!

अक्षय शिंदेवर गोळी चालवणारा पोलीस ऑफीसर कोण?, महत्त्वाचं कनेक्शन समोर

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now