BSA Gold Star 650 l भारतीय बाजारपेठेत मोठे इंजिन असलेल्या बाइक्सची क्रेझ खूपच जास्त आहे. या हेवी इंजिन बाइक्समध्ये पहिले नाव रॉयल एनफिल्ड या बाईकचे आहे जे की ती बाईक देशातील तरुणांना खूपच आवडते. आता BSA कंपनी देखील या सेगमेंटमध्ये नवीन बाईक लाँच करणार आहे.
या दिवशी होणार लाँच :
मिळालेल्या माहितीनुसार, BSA आपली नवीन बाईक Gold Star 650 15 ऑगस्ट रोजी भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. याआधी रॉयल एनफील्ड आपली नवीन रॉयल एनफील्ड क्लासिक 350 देखील देशात लाँच करणार आहे. BSA च्या या आगामी बाईकची रचना खूपच आकर्षक असणार आहे. कंपनी ही बाईक रेट्रो डिझाईनसह बाजारात आणणार आहे.
आता या बाईकच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, BSA च्या या नवीन बाईकमध्ये LCD डिस्प्लेसह स्लिपर क्लच आणि USB चार्जर असणार आहे याशिवाय ड्युअल चॅनल एबीएससह एलईडी टेल लॅम्पही बाईकमध्ये असणार आहे. एवढेच नाही तर ऑल-एलईडी लाइटिंग, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह अनेक आधुनिक फीचर्स बाइकमध्ये पाहायला मिळतील.
BSA Gold Star 650 l इंजिन आणि किंमत काय असणार? :
कंपनी 652 सीसी सिंगल-सिलेंडर लिक्विड-कूल्ड इंजिनसह BSA गोल्ड स्टार बाईक बाजारात आणणार आहे. हे इंजिन 44.27 bhp च्या कमाल पॉवरसह 55 Nm चा पीक टॉर्क निर्माण करेल. याशिवाय, हे 5 स्पीड गिअरबॉक्ससह देखील कनेक्ट केले जाईल. बाईकच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेंशन असेल, तर मागे 5-स्टेप प्री-लोड ॲडजस्टमेंटसह ट्विन शॉक दिले जातील. समोर आणि मागे डिस्क ब्रेक देखील दिसतील.
BSA च्या या नवीन बाईकच्या किमती अजून समोर आलेल्या नाहीत. पण अंदाज वर्तवला जात आहे की कंपनी ही बाईक जवळपास 3 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत बाजारात आणू शकते. ही बाईक बाजारात रॉयल एनफिल्डच्या 650 सीसी बाईकला टक्कर देणार आहे.
News Title : BSA Gold Star 650 Bike
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ धक्कादायक कारणामुळे बांगलादेशच्या पंतप्रधान देश सोडून पळाल्या; दिला राजीनामा
दुचाकी बाईक चालवण्याआधी ही बातमी वाचा; या लोकांवर होणार थेट कारवाई
गोविंदाच्या भाचीने सोशल मीडियावर घातला धूमाकुळ, पतीसोबतचे ते फोटो व्हायरल
भाजपचं टेन्शन वाढलं; विधानसभेसाठी मनसेचे दोन उमदेवार जाहीर, पाहा कोण आहेत?
“राज ठाकरेंना तुरुंगात टाकलं पाहिजे”; प्रकाश आंबेडकरांची थेट मागणी






