बोरीवली लोकल हत्याकांडातील आरोपीने इंटरनेटवर काय शोधलं? धक्कादायक खुलासा उघडकीस

On: June 26, 2026 1:41 PM
Borivali Local Train Murder
---Advertisement---

Borivali Local Train Murder | मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली लोकल ट्रेनमध्ये किरकोळ वादातून झालेल्या हत्येप्रकरणात तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरवाजा बंद करण्याच्या कारणावरून झालेल्या वादात रोशन सुवर्णा याने सहप्रवासी मयंक लोहार याच्यावर चाकूने वार करून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता, मात्र पोलिसांनी अवघ्या 24 तासांत पनवेल येथून त्याला अटक केली. चौकशीत आरोपीकडून अनेक महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात वापरण्यात आलेला चाकू रोशनला त्याच्या ॲमेझॉनमध्ये काम करणाऱ्या मित्राने काही दिवसांपूर्वी घरगुती वापरासाठी दिला होता. आरोपीने तो चाकू बॅगेत ठेवला आणि त्याबद्दल विसरून गेला होता. मात्र लोकलमधील वाद अचानक चिघळल्यानंतर त्याला बॅगेतील चाकूची आठवण झाली आणि त्याने तो बाहेर काढून मयंकवर वार केल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.

सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीपर्यंत पोहोचले पोलीस :

घटनेनंतर रोशन सुवर्णा बोरीवली स्थानकातून पळून गेला होता. पोलिसांनी विविध रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपीची हालचाल स्पष्ट झाली. त्याच्या शर्टवरील ओळख पटणाऱ्या चिन्हाच्या आधारे तपासाचा वेग वाढवण्यात आला. त्यानंतर पोलीस मिरा रोड येथील त्याच्या घरी पोहोचले, मात्र तोपर्यंत आरोपी तेथून निघून गेला होता. (Borivali Local Train Murder)

यानंतर पोलिसांनी आरोपीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्याच्याशी संवाद साधला. कुटुंबीयांच्या माध्यमातून समजावून सांगितल्यानंतर आरोपीने शरण येण्यास तयारी दर्शवली. त्यानंतर पनवेल परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले आणि पुढील चौकशी सुरू करण्यात आली.

Borivali Local Train Murder | मंगळुरूला पळून जाण्याची तयारी, इंटरनेटवरही केली शोधाशोध :

तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी मंगळुरूला पळून जाण्याच्या तयारीत होता. त्यासाठी त्याने बसचे तिकीटही काढले होते. मात्र पोलिसांनी तत्परतेने शोधमोहीम राबवत त्याला अटक केली आणि त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला.

अटकेनंतर आरोपीने पोलिसांना सर्वप्रथम मयंक लोहार जिवंत आहे का, असा प्रश्न विचारल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्याने इंटरनेटवर या घटनेबाबत शोध घेतला असता मयंकचा मृत्यू झाल्याच्या बातम्या त्याला दिसल्या. मात्र तपासादरम्यान आरोपी कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, यासाठी पोलिसांनी सुरुवातीला त्याला मयंकवर उपचार सुरू असल्याचे सांगितले. पुढे बोरीवली पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याला मयंकच्या मृत्यूची अधिकृत माहिती देण्यात आली.

News Title : Borivali Local Train Murder: Friend’s Knife, Internet Search and Escape Plan; Shocking Revelations in Mumbai Case

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now