Bopdev Ghat Gang Rape | पुण्यातील वानवडी परिसरातील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच पुण्यात काल 4 ऑक्टोबररोजी आणखी एक धक्कादायक घटना उघड झाली. पुण्यातील बोपदेव घाट परिसरातून सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यामुळे पुन्हा एकदा पुण्यातील सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बोपदेव घाटामध्ये एका 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. (Bopdev Ghat Gang Rape )
या तरुणीचं अपहरण करून तिघा मित्रांनी तिच्यावर अत्याचार केला.या प्रकरणी कोंढवा पोलिसांकडून तपास केला जात आहे. तीन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 25 पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली आहेत. अशात या घटनेबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.
पुण्यात तिघांकडून तरुणीवर सामूहिक अत्याचार
या प्रकरणी एक सीसीटीव्ही फूटेज समोर आली आहे. यामध्ये संशयित आरोपी तिघे जण दिसत असून पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे. घटनेनंतर आरोपी काही मिनिटांनी पुढे जाऊन थांबले असावे, असा संशय पोलिसांना आहे. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज आणि तांत्रिक डाटाच्या मदतीने तपास सुरू केला आहे. (Bopdev Ghat Gang Rape )
ही घटना ज्या ठिकाणी घडली तिथे मोबाइल रेंज नाही. तसेच दहा किमी अंतराच्या परिसरात सीसीटीव्ही देखील नसल्याने तपास करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.अशात बोपदेव घाटात सासवडच्या बाजूला तीन संशयितांचं एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे.
नेमकं काय घडलं?
गुरुवारी रात्री सुमारे 11 वाजताच्या सुमारास एका 21 वर्षीय मुलीवर तीन जणांनी अत्याचार केला. पीडित मुलगी ही पुण्यातील इव्हेंट मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिकत होती. पीडित मुलगी आणि तिचा एक तरुण मित्र हे बोपदेव घाटावर आले होते. याच ठिकाणी आरोपी देखील टु-व्हीलरवर आले होते. या रात्री तीन आरोपी मुलांनी तरुणीसोबत असलेल्या मुलाचा शर्ट काढला. त्याचे पाय बेल्टने बांधून ठेवले आणि गाडीची चवी व मोबाइल देखील काढून घेतला. (Bopdev Ghat Gang Rape )
त्यांच्यापैकी एकाकडे चाकू होता. त्यांनी चाकूचा धाक दाखवत मुलीवर सामूहिक अत्याचार केला. तिला तिथेच सोडलं आणि तिघे त्या ठिकाणावरून पळून गेले. नंतर मुलीने बांधून ठेवलेल्या मित्राला सोडवले. या सर्व घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात अशा अनेक घटना घडत आहेत. यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना तयार झाली आहे.
News Title – Bopdev Ghat Gang Rape big update
महत्त्वाच्या बातम्या-
महाराष्ट्रात प्रचाराचा धुराळा! मोदींची मुंबईत तर राहूल गांधींची कोल्हापुरात तोफ धडाडणार
गुड न्यूज! राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार 4000 रुपये
सुख-समृद्धीने जीवन फुलेल, देवी चंद्रघंटा आज ‘या’ राशींना देणार आशीर्वाद!
आता ‘अहमदनगर’ नव्हे तर ‘अहिल्यानगर’; अहमदनगरच्या नामांतराला केंद्राने दिली मंजुरी
मोठा निर्णय! महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर असं कृत्य केल्यास तुरुंगात जावा लागणार






