बॉलीवूडवर शोककळा! ‘गदर’ फेम प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप

On: November 5, 2024 9:13 AM
Bollywood News Tony Mirchandani Passes Away 
---Advertisement---

Bollywood News | ‘कोई मिल गया’ आणि ‘गदर’ यांसारख्या हिट चित्रपटांतील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते टोनी मिरचंदानी यांचे निधन झाले आहे. ते दिर्घकाळ आजाराने त्रस्त होते. अखेर काल 4 नोव्हेंबररोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. या बातमीमुळे बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. (Bollywood News )

टोनी मिरचंदानी यांनी साकारलेल्या भूमिका आजही चाहत्यांच्या स्मरणात आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर प्रभाव पाडला आहे. ‘कोई मिल गया’ आणि ‘गदर’या चित्रपटातील भूमिकांमुळे त्यांना अधिक प्रसिद्धी मिळाली. त्यांनी अनेक चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारली आहे.

टोनी मिरचंदानी यांचं निधन

अशात त्यांच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनामुळे सिनेजगतात शोककळा पसरली आहे. टोनी मीरचंदानी यांच्या पश्चात पत्नी रमा मीरचंदानी आणि मुलगी श्लोका मीरचंदानी असा परिवार आहे. दिवंगत टोनी मिरचंदानी यांच्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. (Bollywood News )

टोनी मिरचंदानी यांनी चित्रपटांसोबतच अनेक टीव्ही शोमध्येही काम केले आहे. ‘गदर’ चित्रपटामधूनही त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर खोल छाप पाडली. टीव्ही जगतातही ते लोकप्रिय अभिनेते होते. त्यांनी अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. (Bollywood News )

News Title :  Bollywood News Tony Mirchandani Passes Away 

महत्वाच्या बातम्या –

“मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर भोजपुरी गाण्यावर बाई नाचते, हीच का लाडकी बहीण योजना?”

आज विनायक चतुर्थी, बाप्पा ‘या’ राशींच्या आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येणार!

कोल्हापूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; सतेज पाटलांना मोठा धक्का

मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री शिंदेंना धक्का!

“मुस्लिम धर्मगुरुंनी धोका दिल्याने जरांगेंनी माघार..”; मनसे नेत्याची प्रतिक्रिया

Join WhatsApp Group

Join Now