‘शिल्पा म्हणाली आपण देश सोडून जाऊ पण…’; राज कुंद्रांचा खुलासा

On: October 25, 2023 6:30 PM
---Advertisement---

मुंबई | बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Bollywood Actress Shilpa Shetty) पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी पॉर्नोग्राफी (Pornography) प्रकरणात अटक केली होती. मुंबईतील आर्थर रोड (Arthar Road Jail) जेलमध्ये त्याला 2 महिन्याची शिक्षा सुनावली होती. आता त्याच्या तुरूंगातील दिवसांवर भाष्य करणारा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. याबाबत एका मुलखतीमध्ये बोलत असताना राज कुंद्राने अनेक खुलासे केले आहेत.  

राज कुंद्रा काय म्हणाला?

राज कुंद्रा (Raj Kundra) तुरुंगातील दिवसांबद्दल व्यक्त होत असताना म्हणाला, की शिल्पाने देश सोडून परदेशात स्थायिक होण्याचा सल्ला दिला होता. शिल्पाने पहिला प्रश्न विचारला की, राज तुला परदेशात राहायचं आहे का? तू लंडनमध्ये (London) सर्वकाही सोडून आलास. तुझा जन्म तिथेच झाला आणि तिथेच तू लहानाचा मोठा झाला. पण मला भारतात (India) राहायचं होतं म्हणून तू इथे स्थायिक झालास. पण तुझी इच्छा असेल तर मी तयार आहे. आपण हा देश सोडून परदेशात स्थायिक होऊत, असं शिल्पा म्हणाली.

मी तिला सांगितलं की मला भारतात राहायला आवडतं आणि मी हा देश सोडणार नाही. लोक मोठमोठे गुन्हे करून, हजारो कोटी कमावून देशातून निघून जातात. पण मी तर काहीच केलं नाही. त्यामुळे मी देश सोडणार नाही, असं राजने सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now