केज पोलीस ठाण्याबाहेर ब्लॅक गाडीच्या घिरट्या, नेमकं प्रकरण काय?

On: January 15, 2025 2:29 PM
Beed News
---Advertisement---

Beed News l बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता केज पोलीस ठाण्याबाहेर एक कार वारंवार फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे, त्यामुळे पोलिस देखील सावध झाले आहेत.

पोलिसांनी घेतली कारची झडती :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, देशमुख हत्या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराडची रवानगी बीडच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात येणार आहे. मात्र ही माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याबाहेर काळ्या रंगाची सफारी कार वारंवार फिरत होती. त्यामुळे केज पोलिसांनी कारला थांबवून चौकशी केली आहे.

याशिवाय त्या कारची झडती देखील घेतली. मात्र त्यावेळी कारमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. मात्र आता या प्रकारानंतर पोलिसांनी संशयित वाहनांची तपासणीला सुरवात केली आहे. कारण सुरक्षेच्यादृष्टीने ही तपासणी सुरू केली आहे.

Beed News l परळीत शुकशुकाट :

दरम्यान, वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीमध्ये कालपासून तणावपूर्ण शांतता आहे. याशिवाय सर्वत्र बंद देखील पाळण्यात आला आहे. तसेच परळी शहरातील मुख्य बाजारातील दुकाने देखील बंद असून सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे.

मात्र या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे हे आज परळीत दाखल झाले आहेत. कारण धनंजय मुंडे आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, वाल्मिक कराडची आई आणि इतर महिला परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर अद्यापही आंदोलन करत आहेत.

News Title : car roaming around kej police station

महत्वाच्या बातम्या-

धनंजय मुंडेंवर अन्याय का? मविआच्या नेत्याचा सवाल

गुड न्यूज! सोने-चांदीत आली स्वताई, ‘इतक्या’ हजारांची झाली घसरण

महाराष्ट्रात 21 नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची योजना, 26 जानेवारीला घोषणा होण्याची शक्यता

पत्नी, ड्रायव्हरच्या नावे कोटींचे फ्लॅट; वाल्मिक कराडची प्रॉपर्टी पाहून थक्क व्हाल

पैसे गुंतवणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now