Bjp Candidate List | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून पहिली उमेदवारी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या मुलीचा समावेश आहे.
भाजपने एकूण 99 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तुलनेने सुरक्षित असणाऱ्या जागांचा भाजपने आपल्या पहिल्या यादीत समावेश केला आहे. या यादीत भाजप महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे.
भाजपने अशोक चव्हाण यांच्या मुलीला संधी दिली आहे. अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांनादेखील भाजपाने संधी दिली आहे.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांनादेखील भाजपाने तिकीट दिले आहे. ते भोकरदन या जागेवरून निवडणूक लढवतील.
भाजपची पहिली उमेदवार यादी
1. नागपूर पश्चिम – देवेंद्र फडणवीस
2. कामठी -चंद्रशेखर बावनकुळे
3.शहादा – राजेश पाडवी
नंदूरबार- विजयकुमार गावीत
धुळे शहर -अनुप अग्रवाल
सिंदखेडा – जयकुमार रावल
शिरपूर – काशीराम पावरा
रावेर – अमोल जावले
भुसावळ – संजय सावकारे
जळगाव शहर – सुरेश भोळे
चाळीसगाव – मंगेश चव्हाण





महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! नवनीत राणा यांचं राजकीय पुनर्वसन होणार?
लॉरेन्स बिश्नोईच्या चुलत भावाचा सर्वात मोठा खुलासा!
छत्रपती संभाजीनगमध्ये मोठी घडामोड; मनोज जरांगेंची ताकद वाढली
महाविकास आघाडीचा महायुतीवर गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ
एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराला निवडणूक आयोगाचा झटका?






