मतदानाच्या दोन दिवसआधी भाजपचा मोठा डाव, ठाकरे गटाला धक्का

On: November 17, 2024 7:42 PM
Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray
---Advertisement---

BJP | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना भाजपनं शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.

उद्धव ठाकरे गटाला वाशिममध्ये मोठा धक्का बसला आहे. वाशिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी असलेले राजाभैय्या पवार आणि युवासेनेचे जिल्हा सचिव गजानन ठेंगडे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे.

भाजपचा मोठा डाव

यातील राजाभैय्या पवार यांनी आधीच बंडखोरी केली होती, ते वाशिम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. मात्र त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या दोन्ही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा ऐन विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटालासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मनसेलाही मोठा धक्का

दुसरीकडे नाशिकमध्ये भाजपनं मनसेला देखील धक्का दिला आहे. मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सभागृह नेते दिलीप दातीर यांनी ऐनवेळी भाजप उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांना पाठिंबा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मला सिगरेटचे चटके…”, बाॅलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने सलमानवर केले गंभीर आरोप

प्रतिभा पवारांना अडवलं, सोशल मीडियावर अजित पवारांविरोधात संताप

“हनीमूनच्या रात्री, माझ्या शरीराचा…”, करिश्मा कपूरच्या गौप्यस्फोटाने बाॅलिवूड हादरलं!

चंद्रकांत पाटलांकडून सांस्कृतिक परंपरा जपण्याचा प्रयत्न, विविध उपक्रमांना दिलं पाठबळ

विकासाचा वारसा जोपासणाऱ्या निलंगेकरांच्या पाठीशी ताकद उभी करा- बसवराज पाटील मुरूमकर

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now