महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का! खासदाराच्या कुटुंबात पडली राजकीय फूट

On: August 21, 2025 12:20 PM
Maharashtra Politics
---Advertisement---

Congress | महाराष्ट्रात भाजपमध्ये इनकमिंगचा वेग वाढतच चालला आहे. महायुती मजबूत करण्यासाठी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटात सतत विरोधी पक्षातील नेत्यांचे आगमन होत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि वंचित बहुजन आघाडीला मोठा फटका बसत असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीकडून जोरदार रणनीती आखली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपने काँग्रेसला विदर्भात मोठा धक्का दिला आहे.

धानोरकर कुटुंबात राजकीय फुट :

चंद्रपूर लोकसभेच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर (Pratibha dhanorkar) या सध्या कार्यरत आहेत. त्यांच्या पती व माजी खासदार दिवंगत बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर प्रतिभा यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली होती. परंतु याच धानोरकर कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य व बाळू धानोरकर यांचे मोठे भाऊ अनिल धानोरकर (Anil Dhanorkar) यांनी आज भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra chavan) यांच्या उपस्थितीत अनिल धानोरकर अधिकृतपणे भाजपमध्ये दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील तब्बल १० नगरसेवकही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

Congress | अनिल धानोरकर यांची राजकीय वाटचाल :

अनिल धानोरकर हे भद्रावती नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष असून, दोन वर्षे त्यांनी शिवसेना (उद्धव गट) जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. भद्रावती नगरपरिषदेत धानोरकर कुटुंबाची दीर्घकाळ एकहाती सत्ता होती. मात्र, काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना वरोरा मतदारसंघातून तिकीट नाकारले होते. त्यानंतर अनिल धानोरकर यांनी नाराजी व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.

अनिल धानोरकर यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका बसणार आहे. यामुळे काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर (Pratibha dhanorkar) यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे. धानोरकर कुटुंबात राजकीय चुरस निर्माण झाली असून, येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धानोरकर विरुद्ध धानोरकर अशी थेट टक्कर पाहायला मिळू शकते.

भाजपने या प्रवेशाच्या माध्यमातून काँग्रेससोबतच वंचित बहुजन आघाडीवरही आघात केला आहे. महायुतीला स्थानिक निवडणुकीत याचा थेट फायदा होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

News Title: BJP Vidarbha Big Jolt to Congress: Anil Dhanorkar Joins BJP, Political Rift in Dhanorkar Family

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now