भाजपचं मोठं आश्वासन! आता घरोघरी मिळणार ही सुविधा

On: April 14, 2024 11:15 AM
BJP Manifesto For Lok Sabha Election 2024
---Advertisement---

BJP Manifesto l लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजप पक्षाने चांगलीच कंबर कसली आहे. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 साठीचा जाहीरनामा जाहीर केला आहे. या जाहीरनाम्यात भाजपने शेतकरी, महिला, गरीब, व सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासंबंधी कटिबद्ध असल्याचा दावा केला आहे.

घरगुती गॅसच्या दरवाढीला ब्रेक :

पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. अशातच गेल्या कित्येक महिन्यांपासून उज्ज्वला गॅस योजना आणि सर्वसामान्यांच्या घरगुती गॅस योजनांवर केंद्र सरकारने अनुदान दिले आहे. त्यामुळे गॅस सिलेंडरचा भाव काही प्रमाणात कमी झाला असल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट सुरळीत आले आहे. तसेच भाजपने घरोघरी गॅस पाईपलाईन पुरविण्याचे उद्दिष्ट देखील समोर ठेवले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून गॅस कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किंमतीत दरवाढ केलेली नाही. मात्र व्यावसायिक गॅस दरामध्ये काही प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅसच्या किमतीत बदल न झाल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

BJP Manifesto l सबसिडीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार :

गेल्या महिन्यात केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेतंर्गत गरीब महिलांना 300 रुपये प्रति सिलेंडरची सबसिडी देखील जाहीर केली होती. ही सबसिडी मार्च 2024 पर्यंत लागू होणार होती. मात्र आता या सबसिडीमध्ये बदल करण्यात आला आहे. अशातच आता जाहीरनाम्यात ही सबसिडी 31 मार्च 2025 रोजीपर्यंत वाढविण्यात आली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे सबसिडीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दोन वर्षांपूर्वी संसदेत घरोघरी गॅस पाईपलाईनची सुविधा पुरविण्याच्या योजनेची माहिती दिली होती. त्यामुळे आता घरोघरी गॅस पाईपलाईनची सुविधा पुरविण्यात येणार आहे. या योजनेमुळे देशात 1000 एलएनजी स्टेशन तयार करण्याचा संकल्प देखील जोडण्यात येणार आहे.

News Title – BJP Manifesto For Lok Sabha Election 2024 

महत्त्वाच्या बातम्या-

प्रत्येक नागिरकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या ‘या’ गोष्टी माहित असायलाच हव्या!

राजस्थान रॉयल्सच्या विजयाचा हिरो ठरला शिमरन हेटमायर; राजस्थानचा रॉयल विजय

अत्यंत धक्कादायक! सलमान खानच्या घराबाहेर झाडल्या गोळ्या; नेमकं पुढं काय घडलं

या राशीच्या व्यक्तीने प्रवास करणे टाळावा; अन्यथा वाईट घटना घडण्याची शक्यता

“अजित पवार यांच्या सांगण्यावरूनच आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला”

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now