शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याची पार्टनरशीप!

On: November 8, 2025 10:26 AM
Shilpa Shetty Restaurant
---Advertisement---

Shilpa Shetty Restaurant | बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही मागील काही दिवसांपासून तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती राज कुंद्रा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्यावर तब्बल ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीचे आरोप असून, कोर्टाने त्यांना परदेशात जाण्यास मनाई केली आहे. याचदरम्यान, शिल्पा शेट्टीच्या आलिशान ‘बॅस्टियन ॲट द टॉप’ या रेस्टॉरंटबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.

मुंबईतील दादरच्या कोहिनूर स्क्वेअरच्या ४८ व्या मजल्यावर असलेले हे रेस्टॉरंट सेलिब्रिटींमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. नुकतेच या रेस्टॉरंटची शाखा गोव्यात सुरू करण्यात आली असून, त्याचीही मोठी चर्चा सुरु आहे. शिल्पा शेट्टी या रेस्टॉरंटमधून कोट्यवधी रुपयांची कमाई करते.

‘बॅस्टियन’मध्ये भाजप नेते प्रसाद लाड यांची भागीदारी! :

या रेस्टॉरंटमध्ये राज्यातील एका बड्या भाजप नेत्याने मोठी गुंतवणूक केली असल्याचे उघड झाले आहे. भाजप नेते प्रसाद लाड (Prasad lad) यांनीच याबाबत स्वतः माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये त्यांची तब्बल ३३.३३ टक्क्यांची भागीदारी (शेअर्स) आहे.

प्रसाद लाड यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “रेस्टॉरंटचा आमचा फार मोठा बिझनेस आहे. माझ्या मुलालादेखील या क्षेत्राची आवड आहे. बॅस्टियनबद्दल तुम्ही ऐकलंच असेल — या रेस्टॉरंटमध्ये माझ्यासोबत शिल्पा शेट्टी आणि रणजीत बिंद्रा हे पार्टनर आहेत,” असे ते म्हणाले. (Shilpa Shetty Restaurant)

या खुलाशानंतर शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये राजकीय गुंतवणुकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आधीच शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असताना, या नव्या भागीदारीमुळे तिच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल उत्सुकता वाढली आहे.

Shilpa Shetty Restaurant | फसवणूक प्रकरण आणि रेस्टॉरंटची वाढती लोकप्रियता :

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्यावर असलेल्या ६० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणामुळे त्यांच्या प्रतिमेवर परिणाम झाला असला तरी, बॅस्टियन रेस्टॉरंटची लोकप्रियता मात्र कमी झालेली नाही. मुंबईतील हे रेस्टॉरंट उच्चभ्रू समाजात आणि सेलिब्रिटींमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.

शिल्पा शेट्टी सोशल मीडियावरही कायम सक्रिय असून, तिच्या फॅशन आणि फिटनेस पोस्टमुळे ती नेहमी चर्चेत असते. मात्र आता तिच्या रेस्टॉरंटमधील या भागीदारीमुळे बॉलिवूड आणि राजकारण यांच्यातील आर्थिक संबंधांवर नवी चर्चा सुरू झाली आहे.

News Title: BJP Leader Prasad Lad Owns 33.33% Stake in Shilpa Shetty’s Bastian Restaurant – Big Investment Revealed

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now