Narayan Rane Health Update | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना तब्येतीच्या कारणास्तव मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना मंगळवारी (३ सप्टेंबर) रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
राजकीय नेत्यांच्या शुभेच्छा :
रुग्णालयातील मिळालेल्या माहितीनुसार, ४ सप्टेंबर रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. मात्र, नेमकी कोणती शस्त्रक्रिया होणार आहे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले असून, सर्व आवश्यक तपासण्या सुरू आहेत. (Narayan Rane Health Update)
नारायण राणे यांच्या प्रकृतीबद्दलची माहिती समजताच अनेक नेत्यांनी सोशल मीडियावरून त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरून लिहिलं – “ज्येष्ठ नेते नारायण राणे साहेब यांना जसलोक रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समजली. साहेबांनी तब्येतीची काळजी घ्यावी आणि लवकरात लवकर बरे व्हावं, माझ्या सदिच्छा आपल्यासोबत आहेत.”
Narayan Rane Health Update | नारायण राणे – राजकीय पार्श्वभूमी :
नारायण राणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अनुभवी नेते असून, ते राज्यात मुख्यमंत्रिपदासह अनेक महत्त्वाची पदे भूषवले आहेत. सध्या ते केंद्रात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री म्हणून कार्यरत आहेत. ते शिवसेनेतून आपला राजकीय प्रवास सुरू करून काँग्रेसमार्गे भाजपमध्ये दाखल झाले.
विशेष म्हणजे, ते उद्धव ठाकरे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. ठाकरे गटाविरोधात भूमिका घेणे आणि त्यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाहीत, यासाठी ते ओळखले जातात.






