मोठी बातमी! भाजपच्या ‘या’ वरिष्ठ नेत्याची तब्येत बिघडली, दिल्लीत उपचार सुरू

On: December 14, 2024 10:13 AM
Crime News
---Advertisement---

BJP | राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची तब्येत अचानक बिघडली आहे. यामुळे त्यांना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आडवाणी हे सध्या 97 वर्षांचे असून गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खराब होती. आज त्यांना दिल्लीत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. (BJP)

मागच्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या वृत्ताने राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज पुन्हा आडवाणी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलंय.

लालकृष्ण आडवाणी रुग्णालयात दाखल

याच वर्षी लालकृष्ण आडवाणी यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न देखील प्रदान करण्यात आला. प्रकृतीच्या समस्येमुळे ते राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांना त्यांच्या निवासस्थानीच भारतरत्न प्रदान करण्यात आला. मागील महिन्यात 8 नोव्हेंबररोजी त्यांचा वाढदिवस होता. यानिमित पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. (BJP)

पीएम मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक फोटो देखील शेअर केला होता. ज्यामध्ये पीएम मोदी लालकृष्ण अडवाणींना पुष्पगुच्छ देताना दिसून आले होते. आज आडवाणी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांच्यावर दिल्लीत उपचार सुरू आहेत. (BJP)

News Title – BJP leader Lal Krishna Advani admitted to hospital

महत्त्वाच्या बातम्या-

भुजबळ ते धनंजय मुंडे.., राष्ट्रवादीचे ‘हे’ आमदार घेणार मंत्रीपदाची शपथ?

सर्वाधिक मंत्रीपदे भाजपालाच, शिंदे-अजितदादांच्या वाट्याला किती खाती?; यादीच आली समोर

शाहरुख खानमुळे ‘पुष्पा’ एका दिवसात जेलमधून बाहेर; किंग खानने काय खेळी खेळली?

एकाच रात्रीत अल्लू अर्जुन तुरुंगातून सुटला, आता पुढील कारवाई काय?

आज दत्त जयंती, श्री दत्त गुरूंची ‘या’ राशींवर असणार अपार कृपा!

Join WhatsApp Group

Join Now