भाजप नेत्या चित्राताई वाघ ‘या’ मराठी मालिकेत झळकणार; कोणती भूमिका साकारणार?

On: August 29, 2024 3:53 PM
chitra wagh
---Advertisement---

chitra wagh l महिलांच्या प्रश्नांसाठी ठाम पणे उभ्या राहणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ या कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अशातच आता चित्राताई वाघ पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या चित्राताई आता एका मराठी मालिकेत झळकणार आहेत. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘दुर्गा’ या मराठी मालिकेत चित्राताई दिसणार आहेत. या मालिकेत त्या महिला शिक्षणावर बोलताना दिसणार आहेत.

भाजप नेत्या चित्रा वाघ ‘या’ मराठी मालिकेत दिसणार :

राजकीय मंच गाजवणाऱ्या चित्राताई वाघ आता मनोरंजनाचा मंच गाजवणार आहेत. यापूर्वी चित्राताई या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्या होत्या. त्यानंतर त्यांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आहे. पण महिलांच्या प्रश्नांसाठी सुरु असलेला त्यांचा लढा व संघर्ष कायम आहे. राज्यात कोणत्याही महिलेवर अन्याय झाला, तर त्या नेहमीच पुढाकार घेऊन प्रश्न सोडवताना दिसत असतात.

अशातच आता चित्राताई ‘कलर्स मराठी’ या वाहिनीवरील ‘दुर्गा’ या मालिकेत दिसणार आहेत. या मालिकेत त्या महिला शिक्षणावर बोलताना दिसणार आहेत. या मालिकेतील दुर्गा देशमुख ही एक पत्रकार चित्राताई वाघ यांच्याशी संवाद साधताना दिसणार आहे. यावेळी चित्रा वाघ या सामाजिक कार्यकर्त्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.

chitra wagh l दुर्गा देशमुखने मोठा स्कॅम केला उघडकीस :

‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘दुर्गा’ या मालिकेमधील दुर्गा देशमुख ही एक पत्रकार असून तिने एक मोठा स्कॅम उघडकीस आणला आहे. शिवगड या ठिकाणचे आमदार आणि गुहागर येथील सुविद्या कॉलेजचे ट्रस्टी दादासाहेब मोहिते यांच्या कॉलेजमधील कॉपी प्रकार तिने उघडकीस आणला आहे. याबद्दल राजकीय वर्तुळातील देखील अनेक स्कॅम उघडकीस आणणाऱ्या राजकीय नेत्या चित्रा वाघ यांची ‘दुर्गा देशमुख’ने प्रतिक्रिया घेतली आहे. दुर्गाला तिच्या लढ्यात चित्रा वाघ यांनी मोठा पाठिंबा दिला आहे.

यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या की, कॉलेजमधील मुलांना कॉपी करावी लागत असेल तर हे अतिशय चुकीची गोष्ट आहे. कारण शिक्षणाचा दर्जा हा सुधारला पाहिजे. दादासाहेब मोहिते यांनी स्वत: त्यांच्या कॉलेजमधील कॉपी प्रकारात लक्ष घातले पाहिजेत आणि पुन्हा अशाप्रकारची पुनरावृत्ती पुन्हा होणार नाही याची देखील ते काळजी घेतील याची मला पूर्णपणे खात्री आहे. तसेच दुर्गा तुझ्या या लढ्यात मी तुझ्यासोबत आहे असं देखील चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

News Title : Bjp leader chitra wagh in durga serial

महत्त्वाच्या बातम्या-

मधुमेहाच्या रुग्णांनो ‘ही’ गोष्ट करा आणि झटक्यात मधुमेहापासून सुटका मिळवा

बाप्पाच्या आगमनाला 9 दिवस बाकी! ‘या’ 4 गोष्टी चुकूनही विसरू नका!

अजा एकादशीच्या दिवशी ‘हे’ काम करा; विष्णूच्या कृपेने सर्व अडथळे दूर होतील!

प्रतीक्षा संपली! बहुप्रतीक्षित ‘पुष्पा 2’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज

भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा कुख्यात गुंडाने केला सत्कार; नेमकं काय समीकरण असणार

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now