‘या’ अटी पूर्ण करणाऱ्यांना मिळणार मंत्रीपद; काय आहेत निकष?

On: December 2, 2024 11:50 AM
Maharashtra
---Advertisement---

Maharashtra l विधानसभा निवडणुकींचा निकाल जाहीर होऊन तब्बल दहा दिवस होत आले तरी देखील महायुतीचं सरकार अस्तित्वात आलं नाही. मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख आणि ठिकाण ठरलं आहे. परंतु अद्यापही मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर झालं नाही. मात्र आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मंत्रिपदासाठी निकष जाहीर केले आहे. या निकषांची पुर्तता करणाऱ्यांनाचं मंत्रीपद मिळणार आहेत.

निकष काय आहेत? :

महायुतीमध्ये खाते वाटप आणि मंत्रीपदाची जोरदार चर्चा सुरु आहे. कोणत्या पक्षाला कोणती खाती जाणार? तसेच मंत्रिमंडळात नेमका कोणाचा समावेश होणार? याबाबत महायुतीमध्ये चर्चा होत आहे. परंतु आता भाजपमधील मंत्रीपदाचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असणार आहे. यावेळी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

परंतु, राज्यातील दिग्गजांना मंत्रिपदे देताना काय निकष असावेत त्यासंदर्भातील अटी केंद्रीय नेतृत्वाने दिल्या आहे. मात्र त्या मेरीटवर मंत्रीपदे बहाल केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र त्यामध्ये त्या आमदाराची लोकसभा निवडणुकीतील कामगिरी नेमकी कशी होती? त्याच्या मतदार संघ आणि इतर जागांवर त्याने उमेदवार निवडून येण्यासाठी काय प्रयत्न केले आहेत ते देखील पाहिले जाणार आहेत.

Maharashtra l अटी काय आहेत? :

यावेळी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असताना त्या व्यक्तीची कामगिरीचा आढावा देखील घेतला जाणार आहे. तसेच त्याची मंत्रिमंडळाच्या बैठकांची उपस्थिती देखील पाहिली जाणार आहे. याशिवाय मंत्रिमंडळात असणाऱ्या आमदाराबाबत कोणताही वादविवाद नको आहे, अशा सूचना देखील केंद्रीय नेतृत्वाने दिल्या आहे.

तसेच मंत्री असणाऱ्याने सर्वांना एकत्रित समावून घेण्याची जबाबदारी पार पाडावी. याशिवाय पालकमंत्रीपद सांभाळण्याची क्षमता देखील त्याच्यात हवी असल्याचं केंद्रीय नेतृत्वाने म्हटले आहे. या सर्व अटींची पूर्तता करणाऱ्यांना मंत्रीपदाचे खाते वाटप जाहीर होणार आहे.

News Title- BJP decided the criteria for ministerial post

महत्वाच्या बातम्या-

पवार साहेबांनी आर. आर. आबांच्या लेकावर टाकली पक्षाची मोठी जबाबदारी!

12th Fail फेम अभिनेत्याच्या चाहत्यांना धक्का!, सोशल मीडियावर माहिती देत अभिनयाला केला राम राम

महिन्याच्या सुरुवातीलाच आनंदवार्ता! पेट्रोल-डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त?

“महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर…”; जरांगे पाटलांची नवी मोठी घोषणा

सिनेविश्वात खळबळ, प्रसिद्ध अभिनेत्रीचा ‘त्या’ अवस्थेत आढळला मृतदेह

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now