महायुतीत भाजपच ठरला मोठा भाऊ?, उमेदवारांची चौथी यादीही जाहीर

On: October 29, 2024 11:50 AM
BJP Assembly 4th Candidate List
---Advertisement---

BJP | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. जवळपास सर्वच पक्षांनी आपले उमेदवार देखील जाहीर केले आहेत. महायुतीमध्ये आतापर्यंत भाजपने सर्वाधिक 146 उमेदवार जाहीर केले. तर, आज 29 ऑक्टोबररोजी भाजपकडून चौथी यादीही जाहीर करण्यात आली आहे. तर, अजित पवार गटाने आतापर्यंत 51 उमेदवार जाहीर केले असून शिंदेंनी सहयोगी मित्र पक्षांसह 80 जागा जाहीर केल्या आहेत. (BJP)

भाजपाने चौथ्या यादीत एकूण दोन जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. उमरेड (अनुसूचित जाती) आणि मीरा भाईंदर या दोन जागांचा यामध्ये समावेश आहे. या दोन्ही जागांसाठी भाजपने उमेदवारांची नावे घोषित केली आहेत.

चौथ्या यादीत 2 उमेदवारांची घोषणा

भाजपच्या चौथ्या यादीत मुंबईतील मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातून नरेंद्र मेहता यांना संधी देण्यात आली आहे.तर, उमरेड (अनुसूचित जाती) मतदारसंघातून सुधीर पारवे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मीरा भाईंदर येथे विद्यमान आमदार गीता जैन या 2019 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांनी नंतर शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. (BJP)

त्यामुळे मीरा-भाईंदरची जागा महायुतीत कुणाला मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष होतं.या जागेच्या उमेदवारीसाठी गीता जैन आणि नरेंद्र मेहता या दोघांनीही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. अखेर नरेंद्र मेहता यांनी तिकीट मिळवण्यात बाजी मारली आहे.

भाजपच्या तिसऱ्या यादीत कुणाला संधी?

मुर्तिजापूर – हरिश पिंपळे
कारंजा – सई डहाके
तिवसा -राजेश वानखेडे
मोर्शी – उमेश यावलकर
आर्वी – सुमित वानखेडे
काटोल – चरणसिंग ठाकूर (BJP)
सावनेर – आशिष देशमुख
नागपूर मध्य – प्रवीण दटके
नागपूर पश्चिम – सुधाकर कोहले
नागपूर उत्तर – मिलिंद माने
साकोली – अविनाश ब्राह्मणकर
चंद्रपूर – किशोर जोरगेवार
आर्णी – राज तोडसाम
उमरखेड – किशन वानखेडे
देगलूर – जितेश अंतापूरकर
डहाणू – विनोद मेढा
वसई – स्नेहा दुबे
बोरीवली – संजय उपाध्याय (BJP)
वर्सोवा – भारती लव्हेकर
घाटकोपर पूर्व- पराग शाह
आष्टी – सुरेश धस
लातूर शहर -अर्चना चाकूरकर
माळशिरस – राम सातपुते
कराड उत्तर – मनोज घोरपडे
पलुस कडेगाव – संग्राम देशमुख (BJP)

News Title –  BJP Assembly 4th Candidate List

महत्त्वाच्या बातम्या-

माढ्यात शरद पवार खेळणार मराठा कार्ड?, अभिजीत पाटलांनी घेतली जरांगेंची भेट

सरकारचा मोठा निर्णय! दिवाळीच्या काळात बदलणार अनेक नियम

तिकीट न मिळाल्याने नाराजी, मुंबईत महायुतीच्या तीन जागांवर बंडखोरी

आत्महत्येची भाषा करणारे आमदार वनगा कालपासून बेपत्ता, मुख्यमंत्र्यांचा तातडीने फोन

मनसेची सातवी यादी जाहीर, पारनेरमध्ये लंकेंविरोधातही दिला उमेदवार

Join WhatsApp Group

Join Now