..तर असं झालं नाही तर भाजप, शिंदे गट अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढणार?

On: September 23, 2024 10:42 AM
Ajit Pawar Group
---Advertisement---

Ajit Pawar Group l आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे सर्वत्र निवडणुकांचे वारे वाहताना दिसत आहेत. अशातच आता गेल्या कित्येक दिवसांपासून याच अनुषंगाने राज्यात राजकीय घडामोडी देखील सुरु असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सध्या सर्वच राजकीय पक्ष हे निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. अशातच आता महायुतीच्या गोटातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीमधून बाहेर पडावे, यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून प्रयत्न सुरु असल्याचा दावा महाविकास आघाडीतील बड्या नेत्याने केला आहे.

महायुतीतील जागावाटप शेवटच्या टप्प्यात :

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीमधून बाहेर पडावे यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून पद्धतशीरपणे प्रयत्न सुरु असल्याचा दावा काँग्रेसचे जेष्ठ नेते नाना पाटोळे यांनी केला आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपापूर्वीच बाहेर पडावे यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून चक्रव्यूह देखील रचण्यात येत आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्या नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत 160 जागा लढवण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटापैकी एकाला जागावाटपात नमते घ्यावे लागणार आहे. पण मात्र तसं झालं नाही तर महायुतीत हा तिढा निर्माण होऊ शकतो असं देखील म्हटलं जात आहे. या सर्व बाबींचा विचार करता भाजप आणि शिंदे गटाकडून अजित पवार बाहेर पडावे यादृष्टीने वारंवार प्रयत्न केले जात आहेत.

Ajit Pawar Group l महायुतीत महाभारत चाललं आहे; नाना पटोले

महायुतीतील जागावाटपाच्या शेवटच्या टप्प्यात अजित पवार गट जर बाहेर पडला तर आपल्याला जास्तीत जास्त जागा लढवता येतील अशी चर्चा भाजप आणि शिंदे गट यांच्यात रंगली आहे. त्यामुळे या दृष्टीने सध्या प्रयत्न सुरु आहेत. मात्र केंद्रातील नेतृत्वाने याबाबत अद्याप देखील ग्रीन सिग्नल न दिल्याने महायुतीत जागा वाटपात समस्या निर्माण होऊ शकतात असं देखील म्हटल जात आहे.

दरम्यान यासंदर्भात महाविकास आघाडीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांना विचारणा केली असता त्यांनी यावर सर्वात मोठं वक्तव्य केल आहे. महायुतीत महाभारत चाललं आहे, हे मी गेल्या सहा महिन्यांपासून सर्वांना सांगत आहे. त्यामुळे आता पुढे काय काय होतं ते तुम्ही फक्त बघत बसा असं नाना पटोले म्हणाले आहेत.

News Title :  BJP and Eknath shinde try to remove ajit pawar group from mahayuti

महत्वाच्या बातम्या-

नवरात्रीत शनि नक्षत्र बदलणार, ‘या’ 3 राशींचं भाग्य उजळणार

बंगळुरूतील घटनेनं देशभर खळबळ, फ्रीजमध्ये आढळले महिलेच्या शरीराचे 30 तुकडे

मोठी बातमी! मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, संभाजीराजे घेणार भेट

“आमचं चौथ्यांदा सरकार येण्याची गॅरंटी नाही, पण आठवले पुन्हा मंत्री होण्याची गॅरंटी”

आज ‘या’ राशींवर राहणार महादेवाची कृपा; सर्व इच्छा-आकांक्षा होणार पूर्ण!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now