ऐन निवडणुकीत भाजपचा सुप्रिया सुळेंवर अत्यंत गंभीर आरोप, राजकारणात खळबळ

On: November 20, 2024 1:45 PM
Supriya Sule
---Advertisement---

Supriya Sule | आज राज्यात विधानसभेसाठी मतदान पार पडते आहे. निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच भाजपने राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत बिटकॉईन विकून पैशांचा वापर केला असल्याचा आरोप सुळे यांच्यावर करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Supriya Sule)

पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप केलाय. निवडणुकीत परकीय चलन वापरल्याचा व अनेक आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा वापर केल्याचा आरोप सुळे यांच्यावर करण्यात आला आहे.

नाना पटोले व सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप

भाजपा खासदार व प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले आहेत. यासंबंधी त्यांनी कथित पुरावे म्हणून काही कॉल रेकॉर्डिंग्स व व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सचे स्क्रीनशॉट देखील सादर केले. या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आज मतदान करण्याचा दिवस असून त्याच्या आदल्या रात्री असे आरोप करण्यात आल्याने राज्यभर याची चर्चा रंगली आहे.

या सर्व आरोपांवर स्वतः सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्रिवेदी यांच्याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचं खासदार सुळे म्हणाल्या आहेत. परदेशी चलनाचा वापर करून सुळे व पटोले यांनी निवडणुकीवर प्रभाव टाकल्याचा आरोप सुधांशू त्रिवेदी यांनी केलाय.

सुळे यांनी आरोप फेटाळले

तर, सुळे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी एक्सवर याबाबत एक पोस्ट केली आहे. “भाजपाच्या सुधांशू त्रिवेदी यांनी केलेले आरोप निराधार आहेत. मात्र मला त्याचं आश्चर्य वाटत नाही कारण मतदानाच्या पूर्वसंथ्येला अशा प्रकारचे आरोप नेहमीच केले जातात. त्यांच्याकडून (भाजपा) अशा प्रकारे खोटी माहिती पसरवण्याचे प्रयत्न नेहमीच होतात. त्यांनी केलेल्या आरोपांकडे दुर्लक्ष न करता मी त्यांच्याविरोधात खटला दाखल करणार आहे. माझे वकील त्यांच्याविरोधात मानहानीचा फौजदारी व दिवाणी खटला भरतील.”, असं ट्वीट सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलंय.

News Title –  BJP accuses supriya sule of bitcoin scam

महत्त्वाच्या बातम्या-

‘मला दहा मिनिटं…’; विनोद तावडेंचा आणखी एक खळबळजनक व्हिडिओ समोर

नागरिकांनो ‘या’ पैकी कोणतेही एक कागदपत्र असले तरी करता येणार मतदान!

288 जागांसाठी आज मतदान, महाविकास आघाडी vs महायुतीमध्ये चुरशीची लढत

स्वामींच्या कृपेने आज ‘या’ राशींना मिळणार भरभरून यश, मोठं पदही मिळणार!

‘मतदानरुपी राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा’; संभाजी पाटील निलंगेकर यांचं आवाहन

Join WhatsApp Group

Join Now