बिष्णोई गँगचं ‘पुणे कनेक्शन’, अत्यंत धक्कादायक माहिती समोर

On: October 14, 2024 2:33 PM
Lawrence Bishnoi
---Advertisement---

Bishnoi Gang | अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री (दि.12) मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारीही बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. पंजाबमधील प्रसिद्ध गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवालाच्या हत्येच्या प्रकरणात देखील लॉरेन्स बिष्णोई टोळीचा (Bishnoi Gang) हात होता. यापूर्वी या टोळीने पुण्यातील काही गुन्हेगारांशी संबंध जोडले होते. या प्रकरणात पुण्यातील (Pune) दोन व्यक्तींना अटक करण्यात आली होती. अशात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Bishnoi Gang चं ‘पुणे कनेक्शन’

सिद्धू मुसेवाला हत्येच्या तपासादरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी संतोष जाधव याला गुजरातमधून अटक केली होती. जाधवला लपवून ठेवणारे नवनाथ सूर्यवंशी आणि सिद्धेश उर्फ महाकाल कांबळे यांनाही अटक करण्यात आली. तिघेही बिष्णोई टोळीशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलं.

सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर सातत्याने चर्चेत असलेली बिश्नोई गँग (Bishnoi Gang) महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनली आहे. 2021 मध्ये, मंचर परिसरात पूर्वीच्या भांडणामुळे संतोष जाधवने ओंकार उर्फ राण्या बाणखेले याच्यावर गोळीबार करून त्याचा खून केला होता. त्यानंतर तो पळून गेला आणि बिष्णोई टोळीशी त्याचा संपर्क झाला.

Bishnoi Gang | सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. शुभम लोणकर नावाच्या व्यक्तीच्या अकाऊंटवरुन ही पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टवरुन बाबा सिद्दिकीच्या यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेंन्स बिश्नोई गँगने हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.

शुबू लोणकर हे ज्याचे फेसबुक हँडल आहे, त्याचे खरे नाव शुभम लोणकर असू शकते. शुभम लोणकर हा मूळ अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आता अकोला पोलिसांनी देखील तपास सुरु केला आहे.

अकोला पोलीस दलातील आयपीएस अनमोल मित्तल यांचे पथक अकोट तालुक्यातील निवरी बुद्रुक गावात शुभम लोणकर यांच्या घरी दाखल झाले आहेत. मात्र शुभम लोणकर याच्या घराला कुलूप लावलेले होते. त्याच्या घरी कोणीही नसल्याचे पोलिसांना आढळून आलं आहे. विशेष म्हणजे या आधीही शुभम लोणकरवर अकोला पोलिसांनी कारवाई केली होती.

शुभम लोणकर याला यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात अवैध शस्त्रांसह अटक केल होती. दरम्यान, शुभम लोणकरचे लॉरेन्स बिश्नोई कनेक्शनही समोर आलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या- 

मुंबईत टोलमाफी! राज ठाकरे म्हणाले,”आमच्या आंदोलनाला यश..”

महागड्या गाड्या, आलिशान घर, बाबा सिद्दीकींच्या संपत्तीचा आकडा समोर

आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय!

मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंकडून टोलमाफीची घोषणा, पण नेमकी कुठे?

राज्यात ‘या’ दिवशी विधानसभेची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता?

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now