अखेर ठरलंं! भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सर्वात मोठा निर्णय

On: December 4, 2024 12:04 PM
Devendra Fadnavis
---Advertisement---

BJP | विधानभवनातील भाजप विधिमंडळ पक्ष कार्यालयात भाजपची (BJP) कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच

विधिमंडळ पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. उद्या 5 डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा होणार आहे.

भाजपकडून आज 4 डिसेंबर रोजी विधिमंडळ गटनेता निवडण्याची महत्त्वाची बैठक विधीमंडळात पार पडली. या बैठकीत भाजपच्या (BJP) कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या नावावर एकमत झालं.

कोअर कमिटीत सर्वात मोठा निर्णय

सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला. तर आशिष शेलार आणि रविंद्र चव्हाण यांनी या प्रस्तावावर अनुमोदन दिले. नंतर अखेर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.

केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षनेतेपदी शिक्कामोर्तब करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर अखेर सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

आता केवळ ‘या’ पात्र महिलांनाच मिळणार लाडक्या बहिण योजनेचा लाभ; काय आहेत अटी?

महायुतीच्या शपथविधीसाठी उद्धव-राज ठाकरेंसह शरद पवारांनाही आमंत्रण; कोण-कोण लावणार हजेरी?

महायुतीत कुणाला किती मंत्रीपदं मिळणार?, सर्वात मोठी अपडेट समोर

बळीराजाची चिंता वाढली, IMD चा राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा! 

दिल्लीत दोन दिवसांपासून अजित पवार वेटिंगवर; अमित शाहांकडे ‘या’ मागण्या करणार?

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now