Bigg Boss Season 19 | भारतातील सर्वाधिक चर्चेत असलेला आणि वादग्रस्त रिॲलिटी शो बिग बॉस याचा 19 वा सीझन 24 ऑगस्ट 2025 पासून सुरू होत आहे. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान यंदाही सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत. “घरवालों की सरकार” या नावाने येणारा नवा सीझन राजकीय थीमवर आधारित असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (Bigg Boss Season 19)
या वेळी बिग बॉसच्या घरात स्पर्धकांना दोन गटांत विभागले जाणार आहे – ‘सत्ताधारी पक्ष’ आणि ‘विरोधी पक्ष’. घरात सरकारी निर्णयप्रक्रिया, वादविवाद आणि सत्तापालटाचे खेळ रचले जातील. त्यामुळे प्रत्येक टास्कसोबत घरातील समीकरणे बदलतील आणि वातावरण आणखी रंगतदार होणार आहे.
शो कधी आणि कुठे पाहू शकता? :
‘बिग बॉस 19’ चा प्रीमियर 24 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 9 वाजता जिओहॉटस्टारवर होणार आहे. तर त्याच दिवशी रात्री 10.30 वाजता कलर्स टीव्हीवर हा एपिसोड प्रसारित केला जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्म आणि टीव्ही दोन्ही माध्यमांतून शो पाहण्याची संधी मिळेल.
प्रत्येक सिझनप्रमाणे या वेळीही काही वाइल्ड कार्ड एंट्री होणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे यंदा आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनाही घरात आणण्याचे बिग बॉसचे प्लॅन आहेत. ऑक्टोबरमध्ये दिग्गज बॉक्सर माईक टायसन एका आठवड्यासाठी घरात प्रवेश करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याशिवाय WWE सुपरस्टार अंडरटेकर आणि वकील अली काशिफ खान यांची नावे चर्चेत आहेत.
Bigg Boss Season 19 | बिग बॉस 19 मध्ये कोणते स्पर्धक दिसणार? :
यंदा बिग बॉसच्या घरात विविध क्षेत्रांतील कलाकार, इन्फ्लुएन्सर्स आणि सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. (Bigg Boss Season 19)
लोकप्रिय मालिका अनुपमा मधील अभिनेता गौरव खन्ना,
अभिनेत्री अशनूर कौर,
कंटेंट क्रिएटर्स आवेज दरबार आणि नगमा मिराजकर,
रिॲलिटी टीव्ही स्टार बसीर अली,
अभिनेता-मॉडेल सिवेट तोमर,
अभिनेत्री हुनर हाली (गांधी),
गेमर आणि स्ट्रीमर पायल धारे,
लेखक-अभिनेता झिशान कादरी,
अभिनेता अभिषेक बजाज,
अभिनेत्री शफाक नाझ
याशिवाय मृदुल तिवारी आणि शहबाज बदेशा यांच्यातून ‘फॅन्स का फैसला’ या लाइव्ह पोलद्वारे एकाला थेट घरात एंट्री मिळणार आहे.
यंदाचा ‘राजकीय’ सीझन वादविवाद, टास्क आणि सत्तापालटाच्या खेळामुळे अधिक रंजक होणार आहे. प्रेक्षकांना सलमान खानच्या होस्टिंगसोबत घरातील सदस्यांमधील राजकीय वातावरणाचा थरार अनुभवायला मिळेल. त्यामुळे बिग बॉस 19 हा सीझन केवळ मनोरंजनाचाच नाही तर रणनीतींचाही एक भन्नाट संगम ठरणार आहे.






