Bigg Boss Season 18 l बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. टीव्हीवरील वादग्रस्त शो म्हणून ओळखला जाणारा रिॲलिटी शो बिग बॉसचा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कित्येक दिवसांपासून ‘हिंदी बिग बॉसचा 18 वा सीझन’ ऑक्टोबर महिन्यात येणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. अशातच आता बिग बॉसच्या आगामी सीझनचा प्रोमो देखील रिलीज करण्यात आला आहे.
ग्रँड प्रीमियरची तारीख ठरली! :
एकीकडे प्रेक्षकांनी बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनला प्रचंड प्रतिसाद दिला असतानाही हा शो 100 दिवसांचा असूनही आता 70 दिवसांतच संपवण्यात येणार आहे, तर दुसरीकडे बिग बॉस हिंदीचा 18 वा नवीन सीझन देखील सुरु होत आहे.
सलमान खानचा शो बिग बॉस 18 म्हणजेच यंदाच्या वर्षीचा नवीन सीझन येत्या 6 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. तसेच बिग बॉस पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. तर बिग बॉस 18 च्या संदर्भात दररोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. या शोचा पहिला प्रोमो 22 सप्टेंबरला रिलीज झाला होता. तर सलमान खान हा शो होस्ट करताना दिसणार असल्याचे देखील या प्रोमोमधून समोर आलं आहे.
Bigg Boss Season 18 l कुठं पाहता येणार? :
बिग बॉस या शो ला प्रेक्षक प्रचंड चांगला प्रतिदास देत आहेत. कारण या शो मध्ये वेगवेगळे टास्क भांडणं पाहायला मिळतात. बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींचा खरा चेहरा देखील जनतेसमोर येतो. याशिवाय सलमान खान ‘वीकेंड का वार’मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचा चांगलाच क्लास घेताना पाहायला मिळतो.
आता यंदाचा नवीन सीझन अवघ्या काही दिवसांनी सुरु होणार असून बिग बॉस 18 च्या प्रीमियरची तारीख देखील जाहीर झाली आहे. तसेच या शोमधील स्पर्धकांची नाव अद्याप समोर आलेली नाहीत. प्रेक्षक कलर्स चॅनलवर हा शो पाहू शकाल आणि जर तुम्हाला शो मोबाईलवर पाहायचा असेल तर तुम्ही JioCinema वर पाहू शकता.
News Title – Hindi Bigg Boss Season 18 Date
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! संजय राऊत ‘त्या’ प्रकरणी दोषी, मिळाली तुरुंगवासाची शिक्षा
नागरिकांनो ‘या’ व्हिडिओंना लाईक कराल तर थेट होणार पोलीस चौकशी!
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द, दिलं हे कारण!
अक्षयच्या मृतदेहाचे दहन नव्हे तर दफन होणार, पण अंत्यसंस्कारासाठी जागा मिळेना
पुण्यात आज PM मोदींचा दौरा, वाहतुकीत झाले मोठे बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग






