लग्नाआधीच्या शारीरिक संबंधांवर ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली देवाला सुद्धा…

On: October 1, 2024 2:48 PM
Bollywood
---Advertisement---

Bollywood l ‘बिग बॉस ओटीटी 3’ मध्ये प्रचंड गाजलेली अभिनेत्री सना सुल्तान (Sana Sultan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अशातच आता सना सुल्तान तिच्या वैयक्तिक लाईफमुळे चर्चेत आली आहे. सनाच्या च्या चात्यांना प्रश्न पडला आहे की? सना कोणाला डेट करतेय? कारण तिच्या चाहत्यांना सनाच्या रिलेशनशिपबाबत जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता आहे. अशातच आता सना सुल्ताननं आपल्या रिलेशनशिपबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

मी माझं नातं खाजगी ठेवणार :

सना सुल्तान ने एका मुलाखतीत म्हणाली दिली की, मी ठरवलं आहे की, मी लग्न होईपर्यंत माझं रिलेशन कधीच सार्वजनिक करणार नाही. कारण मी माझं नातं खाजगी ठेवणार आहे. तसेच पुढे बोलताना सनानं इशाऱ्यांमध्ये सांगितलं की, ती कुणाशी तरी रिलेशनशिपमध्ये नक्कीच आहे, पण मात्र तिचा बॉयफ्रेंड हा फिल्म इंडस्ट्रीमधला नाही.

याशिवाय सना सुल्तान सध्या नात्यांमध्ये येणाऱ्या दुराव्याबाबत देखील स्पष्ट बोलली आहे. ती म्हणाली की, आजकाल बहुतेक नाती तुटत आहेत, कारण नात्यात दुरावा येतो, तसेच लोक त्या गोष्टी करुन मोकळे होतात, पण मात्र ते लग्नानंतर केलं पाहिजे.

Bollywood l सनाने दिला चाहत्यांना सल्ला :

सना सुल्तान पुढे म्हणाली की, मला असं वाटतं की, लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणं हे देवाला देखील मान्य नाही, मात्र त्यासाठीच लग्नाची पद्धत आहे. म्हणूनच मला वाटतं की, जर तुमचं प्रेम खरं असेल ना तर तुम्हाला लग्नापूर्वीच शारीरिक संबंध ठेवण्याची कसलीच गरजच नाही.

याशिवाय लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवण्याच्या फंदातच कोणी पडायचं नाही. त्यामुळेच पूर्वीची लग्न हे फार काळ टिकत असत. तसेच सनाने चाहत्यांना एक सल्ला देखील दिला आहे. जर तुम्ही ठरवलं की, लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणार नाही, तर माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही लग्नानंतर सुखी आयुष्य जगाल.

News Title – Bigg Boss OTT Fame Sana Sultan Aginst On Physical Reletion

महत्वाच्या बातम्या-

बिग बॉस ग्रँड फिनालेपूर्वी Mid-Week एलिमिनेशन; व्होटिंग लाइन्स ‘या’ दिवशी बंद होणार?

फक्त 13 हजार रुपये देऊन खरेदी करा iPhone 16; जाणून घ्या ऑफर

सुरज चव्हाण झळकला मोठ्या पडद्यावर! चित्रपटातील रोमँटीक गाणं रिलीज

अभिनेता गोविंदाच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून महत्त्वाची अपडेट समोर!

शेतकऱ्यांनो ‘ही’ गोष्ट करा; अन्यथा अनुदानाचे पैसे मिळणार नाहीत

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now