Bigg Boss Marathi | ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या तूफान चर्चेत आहे. घरातील स्पर्धकांमधील मैत्रीचं समीकरण आता बदललं आहे. पहिल्या दिवसापासून तयार झालेले ग्रुप आता फुटताना दिसून येत आहेत. या स्पर्धेत निक्की तांबोळी सध्या सर्वाधिक चर्चेत असणारी स्पर्धक ठरत आहे.अरबाज-निक्की ही जोडी संपूर्ण घराविरोधात लढत देताना दिसत आहे. त्यातच वर्षा उसगांवकर यांच्याबद्दल निक्की सतत काही न काही बोलताना दिसून येत आहे.(Bigg Boss Marathi)
अशात निक्कीने वर्षा उसगांवकर कॅप्टन झाल्यापासून “मी घरात वॉशरुम स्वच्छ करणार नाही, काम करणार नाही” अशी भूमिका घेतली आहे. इतकंच नाही तर, निक्की घरात कोणतंच काम करत नसल्याने जान्हवीने सर्वांसमोर “मी बनवलेलं जेवण निक्कीने जेवायचं नाही” असं म्हटलंय.
निक्कीचं वर्षा उसगांवकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य
“निक्की आपला कचरा तसाच टाकते. भांडी घासत नाही, वॉशरुम स्वच्छ करत नाही त्यामुळे मी केलेलं जेवण तिने जेवायचं नाही”, असं जान्हवीने म्हटलं आहे. यामुळे दोघींमध्ये चांगलंच भांडण झालं. याचदरम्यान निक्कीने वर्षा उसगांवकरांबद्दल पुन्हा एकदा चुकीचे शब्द वापरले.(Bigg Boss Marathi)
निक्कीने वर्षा यांच्याबद्दल अपशब्द वापरले. ” मला अडवणारा अजून जन्माला आलेला नाही. तुम्ही मला हुकूम देऊ नका. कॅप्टन आहात, तर कॅप्टनच राहा. इथे बादशाह नका होऊ…माझा बाप बनू नका. समजलं ना? कॅप्टनच्या हैसियतमध्ये राहा.”, असं निक्की म्हणाली आहे. यावरून आता नेटकरी देखील चांगलेच संतापले आहेत. अशात अभिनेता पुष्कर जोग याने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट करून संताप व्यक्त केला आहे.
पुष्कर जोगची पोस्ट चर्चेत
‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) पहिल्या पर्वाचा उपविजेता पुष्कर जोगने यासंदर्भात पोस्ट केली आहे. “मला एकदा घरी पाठवा… वर्षा उसगांवकर मॅमचा एवढा अपमान मी सहन करू शकत नाही. अरे मर्दांनो उठा… त्या फिक्कीचा माज उतरावा #कहर” अशी पोस्ट करत पुष्करने ‘कलर्स मराठी’ व ‘बिग बॉस मराठी’ला देखील टॅग केलं आहे.

आता निक्कीच्या अशा वागण्यावर रितेश देशमुख काय प्रतिक्रिया देणार ते पाहावं लागेल.घरातून बेघर होण्यासाठी एकूण सात सदस्य नॉमिनेट आहेत. आता घन:श्याम, अभिजीत, सूरज, आर्या, निक्की, अरबाज आणि धनंजय यांच्यापैकी कुणाचा पत्ता कट होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Bigg Boss Marathi)
News Title – bigg boss marathi pushkar jog post on nikki tamboli
महत्त्वाच्या बातम्या-
गणेशोत्सवापूर्वी आनंदवार्ता! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या लेटेस्ट किंमती
आज ‘या’ 5 राशींवर राहील भगवान विष्णूची कृपा, धनसंपत्तीत होईल वाढ
सावधान! ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस पडणार
शिल्पकार जयदीप आपटे सापडला, अटक होताच वकिलांकडून धक्कादायक गौप्यस्फोट






