Bigg Boss Marathi 5 l बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती मिळाली आहे. 53 दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या शोने TRP चे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. अशातच हा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चांना तुफान उधाण आलं आहे. अशातच आता हा शो तीन महिने पूर्ण होण्याआधीच बंद होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
बिग बॉस मराठी 5 बंद होणार? :
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, नुकतंच बिग बॉसचा एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर लाँच झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, बिग बॉसच्या घरात एक पत्रकार परिषद झाली आहे. ही पत्रकार परिषद आजच्या एपिसोडमध्ये दाखवण्यात येणार आहे.
मात्र यापूर्वीचा विचार करता साधारणपणे बिग बॉसचा फिनाले हा जवळ आला की अशाप्रकारची पत्रकार परिषद घेतली जाते. मात्र अद्याप बिग बॉस मराठी सुरू होऊन फक्त 53 दिवस झाले आहेत, अशातच अचानकपणे घरात पत्रकार परिषद झाली आहे, त्यामुळे हा शो 53 दिवसातच संपणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Bigg Boss Marathi 5 l बिग बॉस 70 दिवसामधे संपवू नका :
पत्रकार परिषदेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स करून हा शो लवकर संपणार असल्याचं म्हटलं आहे. ‘एवढ्या लवकर पत्रकार?’ ‘६ ऑक्टोबरला फिनाले होणारे.. टॉप 5 सदस्य अभिजित, सूरज, अंकिता, निक्की अरबाज’ या सदस्यांचा समावेश आहे. तसेच एवढ्या लवकर पत्रकार परिषद?? एवढा जास्त TRP असून सुद्धा’ ‘100 दिवसांचा शो फक्त 70 दिवसामधे नका संपवू,’ अशा कमेंट्स या व्हिडीओवर येत आहेत.
या प्रोमोशिवाय सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये दिसत आहे की, बिग बॉस मराठी 5 चा ग्रँड फिनाले हा 6 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात बिग बॉस मराठी टीम किंवा चॅनलकडून ग्रँड फिनालेच्या तारखेची कोणतीही माहिती अद्याप सांगितलेली नाही. मात्र नुकतीच व्हायरल झालेली पत्रकार परिषद आणि हे व्हायरल रील पाहून शो संपणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
News Title : Bigg Boss Marathi 5 Grand Finale
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाच्या प्रिन्सने बांगलादेशला धु धु धुतलं… ‘या’ दिग्ग्ज खेळाडूंना टाकलं मागे
निवडणुकीपूर्वीच अजित पवारांना जोर का झटका; ‘हा’ बडा नेता फुंकणार तुतारी?
ऐश्वर्या राय आणि सलमानबद्दल ‘या’ अभिनेत्रीकडून आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा!
एअरटेलने ग्राहकांना दिलं दिवाळी गिफ्ट! सर्वात स्वस्त प्लॅन लाँच
पुणे हादरलं! मध्यरात्री 1 वाजता दरवाजा ठोठावला अन्…; पुढचा घटनाक्रम ऐकून थरथराल






