Bigg Boss 19 House | ‘बिग बॉस 19’च्या घरात नेहमीच गोंधळ, वादविवाद आणि रणनीती रंगत असतात. मात्र यावेळी फक्त शो नव्हे तर स्पर्धकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. स्पर्धक बसीर अलीला सकाळी लक्षात आलं की, घरातील गॅस रात्रभर सुरूच राहिला होता. ही मोठी निष्काळजीपणाची बाब होती, जी वेळेत समोर आली नसती तर संपूर्ण घर अनर्थाच्या विळख्यात सापडलं असतं. (Bigg Boss 19 House Gas Leakage)
सुरक्षेवर प्रश्नचिन्ह? :
या घटनेमुळे केवळ घरातील स्पर्धकांच्याच नाही तर शोच्या व्यवस्थापन आणि देखरेखीवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. बसीरनं तत्काळ हा मुद्दा उचलून धरला आणि सर्व सदस्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्याने सांगितले की, “अशा चुकीकडे दुर्लक्ष केल्यास प्रत्येकाचा जीव धोक्यात येऊ शकतो.”
गॅस गळतीच्या प्रकरणावर घरात मोठा वाद रंगला. काही सदस्यांनी आपली चूक मान्य करत क्षमाही मागितली, तर काहींनी याकडे दुर्लक्ष केलं. उलट बसीरच मुद्दा उगाच मोठा करत असल्याचेही काहींनी म्हटले. या मतभेदांमुळे घरातील वातावरण आणखी तापले आणि आरोप-प्रत्यारोपांचा पाऊस पडला.
Bigg Boss 19 House | सलमान खानची भूमिका काय असेल? :
गंभीर सुरक्षेच्या या त्रुटीवर आता सर्वांचे लक्ष ‘वीकेंड का वार’ कडे लागले आहे. सलमान खान या प्रकरणावर काय भूमिका घेणार आणि संबंधित सदस्यावर कशा प्रकारची कारवाई होणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले गेले आहे. (Bigg Boss 19 House Gas Leakage)
या घटनेतून हे स्पष्ट होतं की, ‘बिग बॉस’चं घर हे केवळ मनोरंजनासाठीच नसून, सुरक्षा आणि जबाबदारी तितकीच महत्त्वाची आहे. बसीरचं भावनिक आवाहन हे प्रेक्षकांना हादरवून सोडणार असून, अशा निष्काळजीपणाने किती मोठं संकट ओढवू शकतं याची जाणीव करून देणार आहे.
स्पर्धकांची नावं आणि ट्विस्ट :
या सीझनमध्ये आधीपासूनच गायक अमाल मलिक, अभिनेता गौरव खन्ना, इन्फ्लुएंसर अवेज दरबार-नगमा मिराजकर आणि नेहल चुडासमा असे दिग्गज स्पर्धक आहेत. नुकताच शहनाज गिलचा भाऊ शाहबाज वाइल्डकार्ड एन्ट्री घेत शोमध्ये दाखल झाला आहे. शोची नवी थीम स्पर्धकांना नियंत्रणाची शक्ती देणारी असल्याने, अशा घटनांमुळे पुढील भाग आणखी नाट्यमय होणार हे नक्की.






