Bigg Boss 19 Contestants List | प्रेक्षकांनी ज्याची आतुरतेनं वाट पाहत होती तो रिअॅलिटी शो बिग बॉस 19 अखेर सुरू झाला आहे. सलमान खानने रंगतदार प्रीमियरदरम्यान या सीझनचे सर्व 16 स्पर्धक प्रेक्षकांसमोर आणले. यंदा शोच्या नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले असून, पुढील काही महिन्यांत हे स्पर्धक भांडणं, मैत्री, प्रेम आणि कटकारस्थानं करताना दिसणार आहेत.
स्पर्धकांची संपूर्ण लिस्ट :
अशनूर कौर – टीव्ही शो व चित्रपट अभिनेत्री
झीशान कादरी – गँग्स ऑफ वासेपूर फेम
तान्या मित्तल – 25 लाख फॉलोअर्स असलेली सोशल मीडिया इन्फ्लुएंसर
आवेज दरबार – गौहर खानचा दीर, लोकप्रिय कंटेंट क्रिएटर
नगमा मिराजकर – 7 मिलियन फॉलोअर्स असलेली इन्फ्लुएंसर
नेहल चुडासमा – ब्युटी क्वीन, फेमिना इंडिया ग्रँड इंटरनॅशनल 2018 विजेती
बशीर अली – स्प्लिट्सव्हिला 10 विजेता, टीव्ही अभिनेता
अभिषेक बजाज – स्टुडंट ऑफ द इयर 2 आणि बबली बाउन्सर चित्रपटांमधून प्रसिद्ध
गौरव खन्ना – लोकप्रिय टीव्ही अभिनेता
नतालिया – हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधित अभिनेत्री
प्रणित मोरे – मराठमोळा स्टँडअप कॉमेडियन, सलमान खानची थट्टा करताच घरात धमाकेदार एन्ट्री
फरहाना भट्ट – समाजसेविका, कार्यकर्ती व अभिनेत्री
नीलम गिरी – भोजपुरी स्टार, एन्ट्री करताच नृत्याने शो गाजवला
कुन्निका सदानंद – सलमानसोबत चित्रपट केलेली अभिनेत्री, आता वकील
मृदुल तिवारी – मतांमध्ये जिंकून बिग बॉसच्या घरात पोहोचलेला स्पर्धक
अमाल मलिक – लोकप्रिय संगीतकार, प्रीमियरमध्ये लाईव्ह परफॉर्मन्स
Bigg Boss 19 Contestants List | मराठी प्रेक्षकांसाठी खास आकर्षण :
या सीझनचं खास वैशिष्ट्य म्हणजे मराठी चेहरा प्रणित मोरे. तो व्यवसायाने स्टँडअप कॉमेडियन असून, आपल्या विनोदाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांना खळखळून हसवतो. बिग बॉसच्या घरात त्याची उपस्थिती मराठी चाहत्यांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
दुसरीकडे, भोजपुरी स्टार नीलम गिरीची एन्ट्रीही जबरदस्त ठरली. तिने रंगतदार नृत्याने मंच गाजवून बिग बॉसच्या घरातील रंगत वाढवली आहे.






