वाल्मिक कराड कुठे लपून बसलाय?, सर्वात मोठी अपडेट समोर

On: December 31, 2024 9:33 AM
Walmik Karad
---Advertisement---

walmik karad | बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप देशमुख कुटुंब तसेच विरोधी पक्षाकडून केला जातोय.या प्रकरणी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे देखील अडचणीत सापडले आहेत. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे, असा आरोप सातत्याने केला जातोय. सध्या बीड हत्या प्रकरणाची चौकशी सीआयडी कडून केली जात आहे. तसेच बीड पोलीसही याचा तपास करत आहेत. (walmik karad )

अशात आता वाल्मिक कराडबद्दल एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड असलेला वाल्मिक कराड हा कुठे लपून बसलाय ते समोर आलंय. वाल्मिक कराड हा महाराष्ट्राच असून सीआयडीचे विशेष पथक त्याच्या शोधासाठी रवाना झाले असल्याची माहिती आहे. काही मीडिया रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आलाय.

वाल्मिक कराडबाबत मोठी अपडेट-

दरम्यान, या प्रकरणी वाल्मिक कराडच्या (walmik karad )पत्नीची देखील चौकशी करण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सीआयडीच्या अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर वाल्मिक कराड यांच्या पत्नीचा तपास सुरु असल्याची माहिती आहे. सध्या ज्योती जाधव यांची चौकशी सुरु असून ज्योती जाधव या वाल्मिक कराडची दुसरी पत्नी असल्याचा दावा धनंजय देशमुखांनी केलाय.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे अशी या आरोपींची नावे आहेत. तर, मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे फरार आहेत.

या प्रकरणी सीआयडीकडून आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने 9 पथकं तयार केली आहेत. यामध्ये 150 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असून याचा वेगवेगळ्या अॅंगलने तपास केला जातोय.

संतोष देशमुख हत्या प्रकरण-

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबररोजी अपहरण करण्यात आले होते. अपहरण करून नंतर त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. या हत्येनंतर बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी वाल्मिक कराड (walmik karad ) हा मुख्य आरोपी असल्याचा दावा केला जातोय.

News Title :  Big update regarding walmik karad

महत्वाच्या बातम्या –

मुंबईकरांनो थर्टी फर्स्टला दारू आणि पार्ट्या जरा जपून; अन्यथा…

‘नक्की कोण कुणाचा आका?’; वाल्मिक कराडचा शिंदे-फडणवीस व अजितदादांसोबतचा फोटो व्हायरल

वर्षाच्या शेवटच्या दिवशी देवी लक्ष्मी ‘या’ राशींवर करणार धनवर्षाव!

मुंबईत हवेचा दर्जा खालावला, नागरिकांच्या आरोग्यासाठी BMC उचलणार कठोर पाऊल

फरार वाल्मिक कराड उज्जैन महाकालच्या दर्शनाला?; ‘ते’ फोटो समोर

Join WhatsApp Group

Join Now