‘निवडणुकीसाठीच योजना…’; लाडकी बहिण योजनेबाबत अजित पवारांची जाहीर कबुली

On: December 1, 2024 3:01 PM
Ajit Pawar
---Advertisement---

Ajit Pawar | विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेमुळे महायुतीला हे यश मिळालं असल्याची टीका केली जात होती.  निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या योजना राबवण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. तसेच आता निकालानंतर सरकारकडून पैसे मिळणार नसल्याचं देखील बोललं जात आहे.

अजित पवारांचं मोठं वक्तव्य

विरोधकांच्या टीकेवर आणि आरोपांवर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठीच लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली अशी जाहीर कबुली अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.

सगळ्या राज्यांनी काही ना काही योजना आणल्या. कोणी पाणी, वीज मोफत दिली, तर कोणी प्रवास मोफत दिला. महिलांना मदत दिली, तर बिघडले कुठे? इतर राज्यांनी दिले, तर ते प्रलोभन नाही का?, असा सवाल अजित पवारांनी (Ajit Pawar) विचारला.

पाच महिन्यांपूर्वी लोकसभेला आमचा पराभव झाला. त्यानंतर आम्ही सर्वजण बसलो आणि योजना आणली. त्यामुळे मतदान वाढलं, त्यामध्ये आमचा काय दोष, असंही अजित पवारांनी (Ajit Pawar) म्हटलंय.

महाविकास आघाडीच्या 31 जागा राज्यात निवडून आल्या. त्या वेळी ‘ईव्हीएम’वर कोणीही बोलले नाही. पाच महिन्यांनंतर त्याच बारामतीमध्ये एक लाखाच्या मताधिक्याने जिंकलो. हे जनमत आहे. ते पाच महिन्यांनी बदलले ते मान्य करायला हवे, असंही अजित पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

महागाईचा अजून एक धक्का! एसटी प्रवास ‘इतक्या’ टक्क्यांनी महागणार

ठाकरे गटात पुन्हा फूट पडणार? ‘या’ बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

‘पिक्चर अभी बाकी है’; युगेंद्र पवारांची मोठी मागणी, अजित पवार अडचणीत?

सर्वसामान्यांना महागाईचा झटका; गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी महागला

महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची पहिली यादी समोर! कोणाला लागणार लॉटरी?

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now