Maharashtra Politics | महाराष्ट्रात पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Election) निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड समोर आली असून महायुतीला मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत.
महायुतीत भाजपची भूमिका काय ?
महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमधील घटक पक्षांनी आपापल्या पातळीवर स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, या निवडणुका आघाडी म्हणून लढवल्या जाणार की स्वतंत्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी स्पष्ट केले होते की, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढवणार आहोत. काही जागांवर अपवादात्मक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील. पण आमचा पहिला पर्याय महायुतीच आहे.”
Maharashtra Politics | राष्ट्रवादीची भूमिका काय? :
मात्र आता राष्ट्रवादी (NCP) अजित पवार (Ajit Pawar) गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी बोलताना पटेल म्हणाले, “नगरपरिषद आणि महानगरपालिका या स्थानिक स्तरावरील निवडणुका असतात. यात अनेक कार्यकर्त्यांची उमेदवारीची इच्छा असते. मोठ्या निवडणुकांमध्ये महायुती शक्य आहे, पण या छोट्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून स्वतंत्र लढलेलं बरं. त्यातून कार्यकर्त्यांना न्याय मिळतो.” या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘एकला चलो रे’ चा नारा देणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे.
आगामी निवडणुकांबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली :
दरम्यान, महाविकास आघाडी या निवडणुका कशा लढवणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यातच राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या शिवसेनेत युती होण्याच्या चर्चांना जोर आलेला आहे.
2022 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने राज्य सरकारला जानेवारी (January) अखेरपर्यंत या निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.






