बागेश्वर महाराजांचा लग्नाबाबत मोठा खुलासा!

On: January 24, 2023 12:20 PM
---Advertisement---

मुंबई | बागेश्वर धाम सरकार(Bageshwar Dham Sarkar) या नावानं जगप्रसिद्द असलेले धीरेंद्र शास्री(Dhirendra Shastri) सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. महाराष्ट्रात ते चर्चेत येण्याचं कारण म्हणजे नागपूरमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं त्यांना दिलेलं आव्हान ते न स्विकारताच तिथून निघून गेले होते.

सध्या धीरेंद्र शास्त्री यांच्या दिव्यशक्तीला सलाम ठोकणाऱ्यांची संख्याही कमी नाही आणि ते अंधश्रद्धा पसरवत आहेत असं म्हणत त्यांना विरोध करणाऱ्यांची संख्याही कमी नाही.

आता या सगळ्यात धीरेंद्र शास्त्री लग्न करणार असल्याच्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. धीरेंद्र शास्री जया किशोरी यांच्यासोबत लग्न करणार आहेत, असं बोललं जात आहे.

या चर्चांवर शास्त्रींनी यापूर्वी प्रतिक्रिया दिली होती. एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या लग्नाच्या बातम्या खोट्या असल्याचं सांगितलं होतं. तसेच जया किशोरी यांनीही फेसबुकवर पोस्ट करत या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं.

दरम्यान, धीरेंद्र शास्री लोकांच्या मनातलं ओळखतात. तसेच त्यांच्या दरबारात गेलेल्या भाविकांचे नाव, फोन नंबर, वडिलांचं नाव ते आपोआप अचूक ओळखतात, असा दावा केला जातोय.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now