India US Trade Deal Update | अमेरिकेने भारतावर लावलेल्या तब्बल 50 टक्के टॅरिफनंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (DOnald Trump) यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं होतं. एवढंच नव्हे, तर भारत रशियाकडून घेतलेल्या तेलाचे पैसे युद्धात वापरले जातात असा आरोप देखील त्यांनी केला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमधील व्यापारसंबंधांमध्ये कटुता वाढली होती.
मात्र आता या पार्श्वभूमीवर एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये अडकलेली व्यापारी डील पुन्हा मार्गावर येत असल्याची माहिती मिळत आहे. या घडामोडींना आता वेग आला असून दोन्ही देशांमधील तणाव कमी होण्याची चिन्हं दिसत आहेत. (India US Trade Deal Update)
भारत-अमेरिका व्यापार डील पुन्हा मार्गावर :
गेल्या काही आठवड्यांपासून भारत आणि अमेरिकेमध्ये एका मोठ्या व्यापारी डील संदर्भात चर्चा सुरू आहे. अमेरिकेचं शिष्टमंडळ नुकतंच भारताच्या दौऱ्यावर आलं होतं. आता भारताचं वरिष्ठ प्रतिनिधीमंडळ या आठवड्यात अमेरिकेला जाणार आहे. या बैठकीत दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक यासंबंधी महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. (India US Trade Deal Update)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर त्यांनी सांगितलं की, “दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा सकारात्मक दिशेने पुढे जात आहेत.” या चर्चेनंतर बाजारपेठेतही सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे.
India US Trade Deal Update | 2030 पर्यंत व्यापार दुप्पट करण्याचं उद्दिष्ट :
सध्या भारत आणि अमेरिकेमधील एकूण व्यापार सुमारे 191 अब्ज डॉलर इतका आहे. दोन्ही देशांनी मिळून तो 2030 पर्यंत 500 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवले आहे. अमेरिकेच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी या डीलसंदर्भात सकारात्मक संकेत दिले आहेत.
अमेरिकेनं टॅरिफ लावल्यानंतर काही काळ दोन्ही देशांमधील चर्चा ठप्प झाली होती. मात्र आता पुन्हा चर्चा सुरू झाल्याने टॅरिफच्या निर्णयावरही काही सकारात्मक बदल होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.






