मोठी बातमी! पुण्याचं पालकमंत्रीपद अजित दादांकडे

On: October 4, 2023 2:20 PM
Chandrakant Patil
---Advertisement---

पुणे | राज्यातील 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून भाजप आणि अजितदादा गटात सुरू असलेली रस्सीखेच अखेर थांबली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे.

पुण्याच्या पालकमंत्रीदावरून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे.

पालकमंत्री पदासाठीची यादी प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर मनासारखा जिल्हा न मिळाल्यामुळे अजित पवार, दादा भुसे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली होती. पुण्याचे पालकमंत्रिपद जरी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे असले तरी अजित पवार पालकमंत्री असल्यासारखे वागताना दिसत होते. त्यानंतर पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून दोघांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली.

चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुण्याचं पालकमंत्रीपद काढून ते अजितदादांकडे देण्यात आलं आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्याकडे कोल्हापूरचं पालकमंत्रीपद जाईल असं वाटत होतं. चंद्रकांतदादा कोल्हापूरचे असल्याने त्यांच्याकडे ही जबाबदारी जाईल अशी चर्चा होती. मात्र चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्याची यादी-

पुणे- अजित पवार

अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील

सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील

अमरावती- चंद्रकांत दादा पाटील

भंडारा- विजयकुमार गावित

बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर- हसन मुश्रीफ

गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम

बीड- धनंजय मुंडे

परभणी- संजय बनसोडे

नंदूरबार- अनिल भा.

पाटील

वर्धा – सुधीर मुनगंटीवार

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now