पुणे रिंग रोडबाबत मोठी बातमी समोर!

On: October 21, 2025 12:04 PM
Pune Ring Road Project
---Advertisement---

Pune Ring Road । पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) च्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड प्रकल्पाला पुन्हा एकदा अडथळा आला आहे. सोलू ते वडगाव शिंदे या पहिल्या टप्प्यातील मार्गासाठी आवश्यक असलेली संरक्षण विभागाची जमीन अद्याप ताब्यात आली नसल्याने निविदा प्रक्रिया सुरू करता येत नाही. परिणामी, या प्रकल्पाला आणखी विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संरक्षण विभागाची जमीन अजूनही ताब्यात नाही

अहिल्यानगर (Ahilyanagar) रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि अवजड वाहनांना पुणे शहराबाहेरून मार्ग देण्यासाठी रिंग रोड प्रकल्प महत्त्वाचा मानला जातो. मात्र, 1997 मध्ये प्रस्तावित झाल्यानंतरही हा प्रकल्प अजून मार्गी लागलेला नाही.

पहिल्या टप्प्यातील 4.7 किमी लांबीचा सोलू–वडगाव शिंदे रस्ता तयार करण्यासाठी पीएमआरडीएने (PMRDA ) जिल्हाधिकारी कार्यालयाला भूसंपादनाचा प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार वन विभागाची जागा राज्य सरकारकडून मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे, पण संरक्षण विभागाची जमीन ताब्यात नसल्याने काम ठप्प आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिली.

Pune Ring Road । 145 कोटींची तरतूद

या रस्त्यासाठी ₹145.75 कोटींची तरतूद करण्यात आली असून, 65 मीटर रुंद आणि 128 किलोमीटर लांबीचा हा वर्तुळाकार रस्ता 44 गावांमधून जाणार आहे. यात हवेलीतील 27, मुळशीतील 10, मावळमधील 6 आणि खेड तालुक्यातील 1 गावाचा समावेश आहे.

एकूण 743.41 हेक्टर जागा या प्रकल्पासाठी आवश्यक असून, त्यापैकी 83 किमीचा भाग पीएमआरडीए, 40 किमी एमएसआरडीसी आणि 5.7 किमी महापालिका विकसित करणार आहे.

News Title- Big news about Pune Ring Road

Join WhatsApp Group

Join Now