Ladaki Bahin Yojana | महाराष्ट्र सरकारच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” (Ladaki Bahin Yojana) संदर्भात एक मोठी आणि महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील लाखो महिलांना दरमहा आर्थिक आधार देणारी ही योजना सुरू झाल्यापासून महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी मोठा आधार ठरली आहे.
ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लवकरच
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा थेट आर्थिक लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असून, त्यासाठी राज्य सरकारकडून तब्बल 410 कोटी रुपयांची मोठी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार असल्याने महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलणार आहे.
Ladaki Bahin Yojana | e-KYC करणे बंधनकारक
मात्र, योजनेच्या पुढील हप्त्यांसाठी सरकारने एक नवी अट लागू केली आहे. ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे सर्व लाभार्थ्यांसाठी आता बंधनकारक करण्यात आले आहे. अनेक महिलांनी अजूनही ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यामुळे सरकारने स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्यांचा पुढील हप्ता थांबवला जाईल. त्यामुळे सर्व महिलांनी शक्य तितक्या लवकर आपल्या नजीकच्या नागरिक सेवा केंद्रात किंवा ऑनलाईन पोर्टलवरून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.
ई-केवायसीसाठी (Ladaki Bahin Yojana) लाभार्थ्यांना आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि बँक खात्याची माहिती आवश्यक असेल. ही प्रक्रिया अतिशय सोपी असून काही मिनिटांत पूर्ण करता येते. सरकारने महिलांना सणासुदीच्या काळात दिलासा देण्यासाठी हा हप्ता वेळेवर देण्याचा निर्णय घेतला आहे. “माझी लाडकी बहीण” (Ladaki Bahin Yojana) योजनेमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील लाखो महिलांना आर्थिक आधार मिळत असून, या योजनेमुळे त्यांच्या स्वावलंबनाचा मार्ग सुकर झाला आहे.
येत्या काही दिवसांत ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार असून, लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करून आपला लाभ कायम ठेवावा, असं स्पष्ट आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे.






