पराभव जिव्हारी लागला; ‘या’ बड्या नेत्याची राजकारणातून निवृत्तीची घोषणा

On: November 26, 2024 4:13 PM
Maharashtra Assembly Results 2024
---Advertisement---

सोलापूर | सोलापूर शहरात मध्य विधानसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार नरसय्या आडम यांचा दारुण पराभव झाला. नरसय्या आडम यांचा डिपॉझिट देखील जप्त झाला आहे. पराभवानंतर त्यांनी मोठी घोषणा केली आहे. माजी आमदार नरसय्या आडम (Narsayya Adam) यांनी संसदीय राजकरणातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

“मी निवडणूक लढवणार नाही”

यापुढे मी कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवणार नाही. ही माझी शेवटची निवडणूक होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आता नवीन चेहरा देणार आहे. उद्या जरी निवडणूका लागल्या तरी मी निवडणूक लढणार नाही, असं ते म्हणालेत.

आमच्या पक्षात वारसदार नेमण्याची पद्धत नाही. जो चळवळीत पुढे जाईल तोच उमेदवार असेल. सोलापूर मध्य विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराने आचारसंहिता भंग केलेला आहे. त्याविरोधात आम्ही गुन्हा दाखल केला आहे, असं आडम मास्तर (Narsayya Adam) म्हणालेत.

आयुष्यभर सामाजिक आणि चळवळीत काम करणार आहे. निवडणुकांमध्ये पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी यापुढे सहभागी होईल, असे म्हणत त्यांनी (Narsayya Adam) राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे.

पराभवानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उदय नारकर आणि नरसय्या आडम (Narsayya Adam) यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावर गंभीर आरोप केले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी म्हणावी तशी कडक कारवाई केली नाही, त्यामुळे आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात जाणार अशी प्रतिक्रिया दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

आधारकार्ड संदर्भात महत्वाची माहिती; नागरिकांना होणार फायदाच फायदा

“तो माझं तोंड बंद…”, लग्नाच्या पाच महिन्यानंतर पती जहीरबद्दल सोनाक्षीचा गौप्यस्फोट!

राजकारणात मोठा ट्विस्ट, भाजपकडून मास्टरप्लॅन, एकनाथ शिंदेंना मोठी जबाबदारी मिळणार?

मतमोजणीत झालायं मोठा घोळ; आव्हाडांनी सादर केली धक्कादायक आकडेवारी

फडणवीसांना मुख्यमंत्री करणं भाजपला पडणार भारी?, ‘या’ 3 गोष्टींनी चिंता वाढवली

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now