काँग्रेसमध्ये मोठा भूकंप; महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा राजीनामा, भाजपात जाणार?

On: February 12, 2024 2:53 PM
Ashok Chavhan
---Advertisement---

मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अशोक चव्हाण यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

अशोक चव्हाणांचा राजीनामा

अशोक चव्हाण भाजपमध्ये कुठल्याहीक्षणी प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
अशोक चव्हाण यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली तर या भेटीनंतर अशोक चव्हाण नॉटरिचेबल झाल्याचं पाहायला मिळालं.

अशोक चव्हाण भाजपात जाणार?

भाजपा कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. यासाठी भाजपा प्रदेश कार्यालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, हा पक्षप्रवेश आज झाला नाही, तर उद्या होणार असल्याची माहिती आहे.

अशोक चव्हाण यांच्यासारखा मातब्बर नेता आणि माजी मुख्यमंत्री भाजपच्या गोटात जाणे काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

गेल्याच आठवड्यात काँग्रेसच्या बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. तर मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यास काँग्रेस पक्ष आणखी खिळखिळा होईल.

अशोक चव्हाण यांना आपल्या घरातूनच राजकारणाच बाळकडू मिळालं होतं. अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्यानंतर अशोक चव्हाण यांना 2008 साली मुख्यमंत्रीपदाची संधीही मिळाली होती. अशोक चव्हाण हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठ नाव असून त्यांची नांदेड जिल्ह्याच्या राजकारणावर चांगली पकड आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली, तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर!

पुणे पोलिसांच्या नाकाखालून गुन्हेगार पळाला!, शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा ससूनमधून फरार

शोएबसोबतच्या घटस्फोटानंतर पहिल्यांदाच सानिया झाली स्पॉट; पापाराझींची घेतली फिरकी, Video

“राज्यात राष्ट्रपती राजवट कशासाठी लावा? तुमच्या काळात केंद्रीय मंत्र्याला…”, मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now