‘हा’ स्पर्धक ठरणार ‘बिग बॉस’ मराठी 5 चा विजेता?

On: October 4, 2024 11:18 AM
Big Boss Winner
---Advertisement---

Big Boss winner l ‘बिग बॉस मराठी 5′ हा सिझन प्रचंड गाजत आहे. मात्र अवघ्या दोन दिवसांनी या शो चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. येत्या 6 ऑक्टोबरला बिग बोस मराठी सिझन 5 चा ग्रँड फिनाले थाटामाटात पार पडणार आहे. अशातच आता कालच्या भागात अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचा प्रवास तब्बल 67 दिवसांनी संपला आहे. मात्र आता ‘बिग बॉस’ शोचे टॉप 6 स्पर्धक देखील समोर आले आहेत. मात्र या पर्वात कोण बाजी मारणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे.

सूरज चव्हाणचं मोठं सिक्रेट लीक :

बिग बोस मराठी 5 च्या सीझनमध्ये अंकिता, सूरज, अभिजीत, निक्की, धनंजय आणि जान्हवी या स्पर्धकांमध्ये आता चुरशीची लढत होणार आहे. त्यामुळे यंदाच्या सिझनचा विजेता कोण असणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच आता ‘बिग बॉस मराठी 5’ शोच्या ग्रँड फिनाले पूर्वीच सूरज चव्हाणचं मोठं सिक्रेट लीक झालं आहे.

‘बिग बॉस मराठी 5’ शो आता अंतिम टप्प्यात असल्याने ग्रँड फिनाले पूर्वी बिग बॉसने घरातील स्पर्धकांचा त्यांचा या घरातील प्रवास दाखवला आहे. यावेळी बिग बॉसच्या इतिहासातील आतापर्यंतचं सर्वात ग्रँड सेलिब्रेशन देखील करण्यात आलं आहे. यावेळी स्पर्धक सूरजचा या घरातील प्रवास पाहताना सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलं आहे.

Big Boss winner l सोशल मीडियावर चर्चांना उधाण :

अशातच आता बिग बॉसने शेवटचा आठवड्यात स्पर्धकांचा प्रवास दाखवल्यानंतर सूरजने देखील स्वतःचं मोठं सिक्रेट जनतेला सांगितलं आहे. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर मी स्वतःचं घर बांधणार आहे. कारण स्वतःचं स्वप्नातील एक तरी सुंदर घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. अगदी त्यामुळेच ‘बिग बॉस’ मधून बाहेर आल्यानंतर सुरज स्वतःचं घर बांधणार आहे.

मात्र या पर्वात सुरज चव्हाणला प्रेक्षकांनी प्रचंड चांगला प्रतिसाद दिल्याने तो टॉप 6 मध्ये गेला आहे. तसेच यंदाच्या पर्वाचा विजेता देखील सुरज चव्हाणच होणार अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. मात्र आता येत्या 6 ऑक्टोबरलाच यंदाच्या पर्वाचा विजेता मिळणार आहे.

News Title – Big Boss Marathi 5 Winner

महत्त्वाच्या बातम्या-

सोनं खरेदी करावं की नाही?, दरवाढीचं सत्र सुरूच; जाणून घ्या आजचे दर

दिवाळी गिफ्ट! रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, जाणून घ्या याचे काय फायदे मिळणार!

मोठी बातमी! शिंदे गटाच्या मंत्र्याचा भीषण अपघात, पिकअपला दिली जोरदार धडक

आज ‘या’ राशींवर राहणार देवी ब्रह्मचारिणीची कृपा!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now