बिग बॉसच्या घरात अरबाजची एन्ट्री; निक्की म्हणाली…

On: October 5, 2024 10:55 AM
Big Boss Grand Finale
---Advertisement---

Big Boss Grand Finale l ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन संपायला अवघे काही तास उरले आहेत. कारण यंदाचा सीझन 70 चा असल्यामुळे या सीझनचा महाअंतिम सोहळा हा उद्या 6 ऑक्टोबरला थाटामाटात पार पडणार आहे. अशातच हा सिझन संपण्याच्या एक दिवस आधी बिग बॉसने एक मोठा ट्विस्ट आणला आहे. तर आता हा ट्विस्ट नेमका काय आहे जाणून घेऊयात…

ग्रँड फिनालेला एक दिवस बाकी :

बिग बॉस मराठीचा यंदाचा सिझन घरातील भांडण, टास्क आणि ट्विस्टमुळे प्रचंड गाजला आहे. मात्र या सीझनमध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे अरबाज-निक्कीच्या मैत्रीची. कारण ‘बिग बॉस’ सुरू झाल्यापासूनच अरबाज आणि निक्कीच्या प्रेमाचे वारे घरात वाहू लागले होते. यानंतर काही दिवसांनंतर त्या दोघांमध्ये भांडण होऊन अरबाज बाहेरील आयुष्यात ‘कमिटेड’ असल्याचं त्याने बिग बॉसच्या घरामध्ये देखील मान्य केलं होतं.

मात्र त्यानंतर काही दिवसानंतर निक्की-अरबाजमधील वाद मिटले आणि दोघांमधील जवळीक जास्त वाढली. अशातच त्यानंतर आठव्या आठवड्यात अरबाजने घराचा निरोप घेतला. यामुळे निक्की तांबोळी प्रचंड भावुक झाली होती.

Big Boss Grand Finale l बिग बॉसच्या घरात सर्व सदस्यांची पुन्हा एकदा एन्ट्री :

अरबाज घराबाहेर गेल्यावर फॅमिली वीकमध्ये निक्कीच्या आईने अरबाजचा साखरपुडा झाला आहे असा खुलासा केला. त्यामुळे निक्कीने अरबाजचं सर्व सामान घराबाहेर स्टोअर रुममध्ये आणून ठेवलं होतं. याशिवाय तिने मी अरबाज सोबत यापुढे संबंध ठेवणार नाही असंही कॅमेऱ्यासमोर देखील सांगितलं होतं. मात्र अशातच आता ग्रँड फिनालेला एक दिवस बाकी असताना बिग बॉसच्या सर्व सदस्यांनी घरात पुन्हा एकदा एन्ट्री घेतली आहे.

त्यावेळी अरबाजला पाहताच निक्की उदास होते. त्यानंतर दोघंही बेडरुम एरियामध्ये हातात हात घेऊन एकमेकांशी बोलत असतात. यावेळी निक्की त्याला सगळ्या गोष्टींचा जाब देखील विचारते आता अरबाज यावर काय उत्तर देणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

News Title – Big Boss Grand Finale

महत्त्वाच्या बातम्या-

बोपदेव घाटातील गँगरेप प्रकरणी मोठी अपडेट; ‘त्या’ CCTV फूटेजने खळबळ

महाराष्ट्रात प्रचाराचा धुराळा! मोदींची मुंबईत तर राहूल गांधींची कोल्हापुरात तोफ धडाडणार

गुड न्यूज! राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार 4000 रुपये

सुख-समृद्धीने जीवन फुलेल, देवी चंद्रघंटा आज ‘या’ राशींना देणार आशीर्वाद!

आता ‘अहमदनगर’ नव्हे तर ‘अहिल्यानगर’; अहमदनगरच्या नामांतराला केंद्राने दिली मंजुरी

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now